-
आपण रोज वापरत असलेल्या चलनी नोटांच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणांचे फोटो पाहतो ती ठिकाणे कुठे आहेत असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? अर्थात नक्कीच कधी ना कधी नोटांकडे निवांतपणे पाहताना तुम्हाला हा प्रश्न पडला असणारा. नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या नोटांच्या मागील बाजूस असणाऱ्या ठिकाणांची नावे छापण्यात आली आहे. पण जुन्या नोटांवर असं छापण्यात आलेलं नाही. त्यामुळेच ही ठिकाणं नक्की कुठे आहेत असा प्रश्न अनेकदा पडतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या नोटेवर कुठला फोटो आहे.
-
१०० रुपयांची जुनी नोट जुन्या शंभरच्या नोटेच्या मागील बाजूस दिसणाऱ्या डोंगररांगा या सिक्कीमधील आहेत. येथील गोइचा ला पर्वतरांगाचा हा फोटो आहे.
-
५० रुपयांची नवी नोट ५० रुपयांच्या नव्या नोटेवर कर्नाटकमध्ये १५ व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेल्या हंपी या जागतिक वारसा यादीतील शहरातील प्राचीन मंदिराचा फोटो आहे.
-
५०० रुपयांची नवी नोट ५०० रुपयांच्या नव्या नोटेवर दिल्लीमधील लाल किल्ल्याचा फोटो आहे.
-
२० रुपयांची जुनी नोट २० रुपयांच्या जुन्या नोटेवर असणारे नारळाचे झाड आणि सुमद्र हा आंदमान बेटांवरील आहे. येथील नॉर्थ बे बेट किंवा कोरल बेटांवरील माऊंट हॅरोट येथून हे दृष्य दिसते.
-
५० रुपयांची जुनी नोट ५० रुपयांच्या जुन्या नोटेवर भारतीय संसदेचा फोटो आहे.
-
२०० रुपयांची नोट मध्यप्रदेशमधील जगप्रसिद्ध शिल्प असणारे सांची स्तूपाचा फोटो २०० च्या नोटेवर दिसतो.
-
१० रुपयांच्या नवी नोट १० रुपयांच्या नव्या नोटेवर ओरिसामधील कोणार्कचे सूर्य मंदिर दिसते.
-
१०० रुपयांची जुनी नोट जुन्या शंभरच्या नोटेच्या मागील बाजूस दिसणाऱ्या डोंगररांगा या सिक्कीमधील आहेत. येथील गोइचा ला पर्वतरांगाचा हा फोटो आहे.
-
५०० रुपयांची जुनी नोट ५०० रुपयांच्या जुन्या नोटेवर दिसणारे गांधीजींचे दांडी यात्रेचे दृष्य म्हणजे दिल्लीतील एक लोकप्रिय ठिकाण आहे. दक्षिण दिल्लीतील सरदार पटेल मार्गावर तीन मारुती भवनजवळील गांधींच्या दांडी यात्रेसंदर्भातील शिल्पाचा हा फोटो आहे.
-
१०० रुपयांची नवी नोट १०० रुपयांच्या नव्या नोटेवर गुजरातमधली पाटण इथील 'राणी की वाव' चा फोटो आहे. २०१४ साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोनं दिला आहे.
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”