-
केंद्रीय मंत्री आणि दिल्लीच्या निवडणुकीतील भाजपचे प्रमुख प्रचारक अमित शहा यांनी शाहीन बागेतील आंदोलन प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे. मतदान यंत्रातील कमळाचे बटन इतके जोरात दाबा की त्यातून निघालेल्या लहरींचा जबर धक्का शाहीन बागलाही जाणवला पाहिजे, असे आवाहन शहा यांनी मतदारांना केले.
-
-
“दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनात बसलेले बहुतांश लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले आहेत,”असं भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा म्हणाले.
-
'पुन्हा एकदा राजकारण बदलण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आठ फेब्रुवारीला सर्व लोकांनी जावे आणि झाडूचं बटण दाबावं. इतकं बटण दाबा, इतकं बटण दाबा की, बटणच खराब झालं पाहिजे,” असं वादग्रस्त विधान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
-
दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ‘देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला’ तसंच ‘आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ’ अशा घोषणा देण्यात आल्या.
-
“ही छोटी-मोठी निवडणूक नाहीये, तर देशाला एकत्र आणणारी आणि स्थिरता देणारी देणारी निवडणूक आहे. 11 तारखेला जर भाजपाचं सरकार बनलं तर एका तासाच्या आत शाहीनबागमध्ये एकही व्यक्ती दिसणार नाही. जर दिसला तर मीपण इथेच आहे आणि तुम्हीही इथेच आहात. माझे शब्द लक्षात ठेवा,” असं भाजपाचे खासदार परवेश वर्मा म्हणाले.
-
“शाहीन बाग येथे सुरू असलेलं आंदोलन सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नाही, तर ते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीन बाग हा देशाला तोडणारा मंच आहे,” अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.

१०० वर्षांनंतर मालव्य आणि भद्रा राजयोगामुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकणार!अचानक होतो धनलाभ, बुध आणि शुक्राची होईल असीम कृपा