रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय़ उद्योगपती होते, मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले होते. अनिल अंबानींचा व्यवसाय गेल्या काही काळापासून तोट्यात आहे. मात्र व्यवसायातील चढउताराचा परिणाम ते त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर होऊ देत नाही. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या अनिल अंबानींची पत्नी टीना अंबानी सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंमधून अनिल अंबानींसाठी त्यांचं कुटुंब किती महत्त्वाचं आहे, हे सहज दिसून येतं. अनिल अंबानींनी अभिनेत्री टीना मुनीमशी लग्न केलं. टीनाबरोबर लग्न करण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. इतकंच नव्हे तर अनिल अंबानी घर सोडायलादेखील तयार झाले होते. अनिल अंबानींना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव अनमोल आणि छोट्या मुलाचं नाव अंशुल आहे. मुलांच्या प्रत्येक यशापशयात ते सोबत खंबीरपणे उभे राहताना दिसतात. अनमोल आणि अंशुल यांचं वडिलांसोबत दृढ नातं आहे. अनिल अंबानी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबासाठी नेहमीच वेळ काढतात. कुटुंबीयांसोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो टीना अंबानी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. -
आपल्या दोन्ही मुलांसोबत टीना आणि अनिल अंबानी मोठा मुलगा अनमोलसोबत टीना आणि अनिल अंबानी -
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, टीना अंबानी)
धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल