-
सध्या पाहायला गेलं तर बाजारात वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे आकाश कंदील मिळू लागले आहेत. अनेकदा बाजारात नवनवीन ट्रेण्ड येत असतात. त्यामुळे दर दिवाळीला आकाश कंदिलदेखील नव्या स्टाइलचे दिसून येत असल्याचं पाहायला मिळतं. ( सर्व फोटो सौजन्य : ‘हर्षाभि क्रिएशन्स’ )
-
सध्या सोशल मीडियावर अशाच एका आकाश कंदिलाची चर्चा रंगली आहे.
-
साधारणपणे पैठणीपासून तयार केलेले ड्रेस, ब्लाऊज, पर्स हे आपण ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण कधी पैठणीपासून तयार केलेला आकाश कंदिल पाहिला आहे का?
-
‘हर्षाभि क्रिएशन्स'ने अशीच एक कमाल केली आहे. पर्यावरणपूरक दिवाळीची कास धरत कागद आणि लाकडाला पैठणी साड्यांची जोड देत हे त्यांनी आकाश कंदिल तयार केले आहेत.
-
अत्यंत आकर्षक आणि देखण्या दिसणाऱ्या या कंदिलांना सध्या खरेदीदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
-
'मयुर', 'राजश्री', 'अरण्या', 'तेजोमय', 'नभोमणी', 'अन्यन्या' ही काही आकाशकंदिलांची नावं आहेत.
-
वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकने कंदील बनविण्यास सुरूवात केली. सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजीही घ्यायला हवी. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यावर भर देत असल्याचे अभिषेकने सांगितले.
-
गेल्या वर्षी त्याने कंदिलांना जरीच्या साड्या, खण, लोकर यांची सजावट केली होती.
-
मात्र, यंदा काही नावीन्यपूर्ण करण्याच्या निमित्ताने या साटम दाम्पत्याने कंदिलांना पैठणीचे स्वरूप दिले.
-
हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. शिवाय कंदिलांकरिता कागदी पिशव्याही तयार केल्या आहेत.
-
सध्या या कंदिलांना मुंबई, विरार, बोरिवली, पुणे, लालबाग आदी भागांमधून मोठी मागणी आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…