-
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पुष्पम प्रिया चौधरी हे नाव चर्चेत आहे. पुष्पम प्रिया या द प्लूरल्स पार्टीच्या प्रमुख आहेत. (सर्व फोटो सौजन्य – पुष्पम प्रिया चौधरी इन्स्टाग्राम)
-
बिहार निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी दोन विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. पाटण्याची बांकीपुर आणि मधुबनीच्या बिस्फी या दोन मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत.
-
पुष्पम प्रिया यांनी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीरात देऊन स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते.
-
पाटण्याच्या बांकीपुरमध्ये पुष्पम प्रिया यांच्यासमोर शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा आणि भाजपाकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितिन नवीन यांचे आव्हान आहे.
-
पुष्पम प्रिया जेडीयूचे विधानपरिषदेतील माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे.
-
मधुबनी जिल्ह्याच्या बिस्फी विधानसभा मतदारसंघातूनही पुष्पम प्रिया निवडणूक रिंगणात आहेत. इथून त्यांच्यासमोर आरजेडीच्या फैयाज अहमद आणि भाजपाच्या हरिभूषण ठाकूर यांचे आव्हान आहे.
-
मूळच्या दरभंगाच्या असलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी लंडनच्या प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.
-
भारतात परतल्यानंतर पुष्पम यांनी बिहारमध्ये राजकारणाचा पर्याय निवडला, कधी काळी त्यांचे वडिल जेडीयूमध्ये होते. पण या निवडणुकीत त्या स्वत:चा वेगळा पक्ष द प्लूरल्स पार्टी बनवून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.
-
पुष्पम प्रिया यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, डॉक्टर आणि अन्य क्षेत्रातील लोकांना तिकिट देण्याचा प्रयत्न केला. पुष्पम मार्च महिन्यापासून बांकीपुरमधील गावांचा दौरा करत होत्या.
-
पुष्पम प्रिया चौधरी या निवडणूक लढवत असलेल्या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

Aditya Thackeray: “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”, मराठी सणांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंची टीका