-
सर्व एक्झिट पोलच्या अंदाजांना चुकीचं ठरवत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला व सत्ता कायम राखली. नवी दिल्ली पक्ष मुख्यालयातील हा फोटो आहे. ( फोटो सौजन्य – प्रेम नाथ पांडे )
-
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागले, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. बिहारमध्ये एनडीएची ही सलग चौथी टर्म असेल. २००५ पासून बिहारमध्ये भाजपा-जेडीयू आघाडीची सत्ता आहे. (फोटो सौजन्य – PTI)
-
विकासाचा मंदावलेला वेग, नितीश कुमार यांच्याबद्दल नाराजी आणि प्रस्थापित सरकार विरोधातील भावना असूनही भाजपा प्रणीत एनडीने मतदारांना आकर्षित करुन सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. (फोटो सौजन्य – PTI)
-
बिहार विधानसभा निवडणुकीत या पाच कारणांमुळे एनडीएला विजय मिळवता आला. (फोटो सौजन्य – PTI)
-
जाती आणि समाजाचं समीकरण – तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडीची मदार मुस्लिम आणि यादव मतांवर होती. भाजपाप्रणीत एनडीने नितीश कुमार ज्या समाजातून येतात, त्या कुर्मी, मागासवर्गीय जाती आणि उच्चवर्णीय मतांवर लक्ष केंद्रीत केले तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर सुद्धा मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य – PTI)
-
व्होट बँक – महिला आणि युवकांसाठी खास सुरु केलेल्या वेगवेगळया योजनांचा मतांच्या रुपाने फायदा झाला. महिला मतदारांनी मोठया प्रमाणावर केलेल्या मतदानाचा फायदा झाला असे एनडीएला वाटते. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत महिला आणि युवकांची मते नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांमध्ये विभागली गेली होती. यंदा भाजपा-जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे महिलांची एकगठ्ठा मते एनडीएच्या पारडयात पडली. (फोटो सौजन्य – PTI)
-
भावनिक आवाहन – नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी दोघांनी प्रचारादरम्यान केलेल्या भावनिक आवाहनाचाही मतदारांवर परिणाम झाला. मतदानाच्या अखेरच्या टप्प्याआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन केले होते. प्रतिस्पर्ध्यांनी नितीश कुमार भावनिक ब्लॅकमेलिंग करत असल्याची टीका केली होती. (फोटो सौजन्य – PTI)
-
पंतप्रधान मोदींनी जनतेला नितीश कुमारांसोबत एक पूर्ण फुल टर्म पाच वर्षांचा सत्ता देण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. कारण सध्याच्या सरकारला तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला होता. २०१७ मध्ये नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजद सोबतची आघाडी तोडून पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन केले. (फोटो सौजन्य – PTI)
-
मत विभाजन – एनडीए विरोधी मतांचे विभाजन सुद्धा जेडीयू-भाजपा आघाडीच्या पथ्यावर पडले. राजद-काँग्रेसची मुख्य मदार मुस्लिम आणि यादव मतांवर होती. पण वेगवेगळया पक्षांनी आपापले उमेदवार उभे केल्यामुळे ही मते विभागली गेली. चिराग पासवान यांचा एलजेपी, पप्पू यादव यांची जन अधिकार पार्टी, ओवेसींची एआयएमआयएम आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीमध्ये महाआघाडीच्या मतांचे विभाजन झाले.
-
नितीश, मोदींची रोख रक्कम जमा करण्याची योजना – डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचा समाजातील अनेक घटकांना फायदा होत आहे. ही योजना मतांच्या रुपाने एनडीएसाठी गेमचेंजर ठरल्याचा अंदाज आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि नितीश सरकारने वेगवेगळया योजना जाहीर केल्या. मनरेगा योजनेची रक्कम वाढवली. त्याचा १३.६२ कोटी कुटुंबांना फायदा झाला.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती