-
दिवाळी संपल्यानंतर देशामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
-
काही राज्यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा तसेच संचारबंदीसारखे निर्णय घेतले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे लस. (Photo: Reuters)
-
अमेरिकेत फायझर कंपनीने बनवलेली करोना प्रतिबंधक लस ९५ टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फायझरने इमर्जन्सीमध्ये लसीकरण सुरु करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. (Photo: AP)
-
भारतातही स्वदेशी कोव्हॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड या लशींच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. कोव्हीशिल्ड ही मूळची ऑक्सफर्डची लस आहे. भारतात करोनाचे रुग्ण वाढत असताना लस उपलब्ध व्हायला आणखी तीन ते चार महिने लागू शकतात.
-
भारत बायोटेकने विकसित केलेली स्वदेशी 'कोव्हॅक्सीन' लस २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत उपलब्ध होऊ शकते तसेच ही लस ६० टक्क्यापर्यंत परिणामकारक असेल, असे भारत बायोटेकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
-
'कोव्हॅक्सीन' ६० टक्क्यापर्यंत परिणामकारक ठरली पाहिजे, ते आमचे उद्दिष्टय आहे असे भारत बायोटेकचे क्वालिटी ऑपरेशन्सचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी सांगितले. लस ६० टक्क्यापेक्षा जास्तही परिमाणकारक ठरेल असे ते इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
-
भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ही लस विकसित केली आहे. अमेरिकेत फायझरने लसीकरणासाठी परवानगीचा अर्ज केलेला असतानाच मॉर्डनाची लस ९४ टक्क्यापर्यंत प्रभावी ठरली आहे. रशियाने त्यांची स्पुटनिक व्ही ९२ टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. (Photo: Reuters)
-
जगभरात करोनाच कहर सुरुच आहे. या आजाराला रोखण्यासाठी यूके, अमेरिका आणि रशियन कंपन्यांचा लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
-
भारतातही तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनची फेज तीनची चाचणी २६ हजार स्वयंसेवकांवर करण्यात येईल.
-
देशभरातील २५ केंद्रावर ही चाचणी होईल. भारतातील करोना व्हायरसच्या लशीची ही सर्वात मोठी मानवी चाचणी आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातील.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती