-
सज्ज स्थितीत असलेला NSG कमांडो. कुठलाही दहशतवादी हल्ल्याचा धोका असेल तर हे कमांडो महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षा करण्यासाठी एका मिनिटात तयार होतात. वांद्रे-वरळी सी लिंकवर काढलेला फोटो. २०१९ मध्ये एनएसजी कॅलेंडरसाठी प्रवीण तालन यांनी काढलेला हा फोटो आहे.
-
हल्ला झालेल्या घटनास्थळावर हेलिकॉप्टरमधून झटकन उतरणं हे एक कौशल्य आहे. २६/११ ला नरीमन हाऊसवरील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी NSG कमांडोंनी हे कौशल्य दाखवून दहशवाद्यांचा खात्मा केला होता.
-
NSG ही भारताच्या एलिट कमांडोफोर्सपैकी एक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत एनएसजी काम करते. प्रामुख्याने दहशतवादा विरोधात लढण्यासाठी NSG ची स्थापना करण्यात आली आहे. एनएसजीच्या कमांडोंना प्रतिकुल परिस्थितीत लढण्यासाठी तयार केले जाते.
-
केंद्रीय मंत्रिमंडळाने १९८४ साली स्पेशल कमांडो फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट १९८६ मध्ये या संबंधी संसदेत विधेयक सादर करण्यात आले. त्यानंतर त्याचवर्षी NSG ची अधिकृत स्थापना झाली. एनएसजी कमांडोना सर्व प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार केले जाते. मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीवर सर्वसामान्यांना अत्यंत धोकादायक वाटणारं मॉक ड्रील करताना NSG कमांडोज. वित्तीय संस्था नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात.
-
NSG कमांडोजना ब्लॅक कॅट कमांडोजही म्हटले जाते. चित्त्याच्या चपळाईने लक्ष्याचा वेध घेणे ही त्यांची खासियत आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी त्यांना ट्रेन केले जाते.
-
पेटत्या आगीच्या ज्वाळांमधून मार्ग काढणारा एनएसजी कमांडो. अपहरणाच्यावेळी कुठलीही स्थिती असू शकते. अशा वेळी जमीन, पाणी आणि हवा तिन्ही ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी या कमांडोजना ट्रेन केले जाते.
-
एनएसजी कमांडोजना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार केले जाते. त्यांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जाते.
-
द ब्लॅक शार्कस पाण्याखालून सुद्धा ऑपरेशन करण्यासाठी या कमांडोजना तयार केले जाते. ब्रिटनची स्पेशल एअर सर्व्हीस म्हणजे SAS आणि जर्मनीच्या GSG 9 च्या धर्तीवर NSG ची स्थापना करण्यात आली आहे.
-
सर्वसामान्यांना या NSG कमांडो फोर्सचे महत्त्व १२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी लक्षात आले.
-
त्यावेळी NSG कमांडोजनी मुंबईतील ताज महाल, ओबेरॉय ही फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि नरीमन हाऊसमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती