मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या सवयींबद्दल आणि दिनक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा दिनक्रम कसा आहे, ते जाणून घेऊयात.. मुकेश अंबानी यांनी स्वत: व त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी काही मुलाखतींमध्ये दिनचर्येबद्दल सांगितलं आहे. मुकेश अंबानी रोज पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास उठतात. त्यानंतर ते जिममध्ये वर्कआऊट करतात. एंटिलिया या त्यांच्या निवासस्थानीच दुसऱ्या मजल्यावर आलिशान जिम आहे. जिमवरून आल्यानंतर ते स्नान व ध्यान करतात. त्यानंतर साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान ते एंटिलियाच्या १९व्या मजल्यावर नाश्त्यासाठी पोहोचतात. मुकेश अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहेत. नाश्त्यामध्ये ते पपईचं ज्यूस, दलिया किंवा दहीसोबत चपाती खातात. सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास ते एंटिलियाच्या १४ व्या मजल्यावर स्वत:च्या खोलीत ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात. १० ते ११ वाजताच्या सुमारास ते ऑफिससाठी घरातून निघतात. ऑफिसला जाण्यापूर्वी ते पत्नी, मुलांसोबत थोडा वेळ आवर्जून घालवतात. आईचा आशिर्वाद घेतल्याशिवाय ते घरातून निघत नाहीत. नरीमन पॉईंट इथल्या मुख्य ऑफिसमध्ये ते जवळपास दहा ते बारा तास काम करतात. रात्री ११ च्या नंतर ते घरी परततात. मुकेश अंबानी घरी कितीही उशिरा आले तरी नीता अंबानी त्यांच्यासोबत रात्रीचं जेवण करण्यासाठी थांबतात.

४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार