-
कोटक वेल्थच्या मदतीने हुरुन इंडिया ने भारतातील १०० श्रीमंत महिलांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महिलांची मिळून संपत्ती २.७२ लाख कोटी इतकी आहे. या श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये प्रथम सात कोणत्या भारतीय महिला आहेत हे पाहूया…
-
नायका कंपनीच्या फाल्गुनी नायर (आणि कुटुंब ) या दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५,४१० कोटी रुपये इतकी आहे.
-
थरमॅक्स कंपनीच्या अनू आगा आणि मेहेर पुदुमजी या नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५,८५० कोटी रुपये इतकी आहे.
-
अलेम्बिक फार्मास्युटिकल्स कंपनीच्या मलिका चिरायू अमिन या आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७,५७० कोटी रुपये इतकी आहे.
-
हीरो फिनकॉर्प कंपनीच्या रेणू मुंजाल या सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८,६९० कोटी रुपये इतकी आहे.
-
सहाव्या क्रमांकावर अरिस्टा नेटवर्क्स कंपनीच्या जयश्री उल्लाल आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०,२२० कोटी रुपये इतकी आहे.
-
पाचव्या क्रमांकावर जोहो कंपनीच्या राधा वेम्बू आहेत. त्यांची एकूण संपत्ती ११,५९० कोटी रुपये इतकी आहे.
-
हुरुन श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये मध्ये चौथ्या क्रमांकावर डिविस लेबोरेटरीज कंपनीच्या निलिमा मोटापार्टी आहेत. त्यांची एकूण संपत्ती १८,६२० कोटी रुपये इतकी आहे.
-
तिसऱ्या क्रमांकावर लीना गांधी-तिवारी आहेत. लीना USV कंपनीच्या अध्यक्ष आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१,३४० कोटी रुपये इतकी आहे.
-
हुरुन रिच लिस्ट मध्ये किरण मजूमदार शॉ या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहे. किरण या बॉयोकान कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३६,६०० कोटी रुपये इतकी आहे.
-
HCL टेक्नोलॉजीच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. रोशनी यांची एकूण संपत्ती ५४,८५० कोटी रुपये इतकी आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती