-
मुकेश आणि नीता अंबानी हे देशातील श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. या जोडप्याकडे असलेल्या संपत्तीचा अंदाज लावणं निव्वळ अशक्य आहे. केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत जोडप्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.
-
अगणित संपत्तीची मालकीण असलेल्या नीता अंबानी यांना २३व्या वर्षी एक जबर धक्का बसला होता. त्या कधीही आई होऊ शकत नाहीत असं त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं.
-
नीता अंबानी कधीही आई होऊ शकत नाहीत ही गोष्ट समजल्यावर त्यांना चांगलाच हादरा बसला होता. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.
-
IDiva ला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी म्हणाल्या होत्या, "मी शाळेत असताना अनेकदा 'मी आई झाले तर..' या विषयावर निबंध लिहायचे. पण लग्नानंतर काहीच वर्षांत डॉक्टर्सनी मला सांगितलं की मी आई होऊ शकत नाही. वयाच्या २३व्या वर्षी ही गोष्ट ऐकून मी खूपच खचले होते."
-
डॉ. फिरूजा पारिख यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखीखाली नीता अंबानी यांनी IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने इशा आणि आकाश अंबानी यांना जन्म दिला. ही दोघं जुळी भांवंड आहेत.
-
फिरूजा पारिख या एक प्रसिद्ध गायनाकोलॉजिस्ट आहेत. त्यांची केवळ भाततातच नव्हे तर देशाबाहेरही ख्याती आहे. पारिख या IVF तंत्रज्ञानाच्या जाणकार आहेत.
-
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी डॉ. फिरूजा पारिख यांच्या IVF तंत्रज्ञानाच्या मदतीनेच पालक झाले आहेत.
-
डॉ. फिरूजा पारिख यांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्यानुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने दिग्दर्शक फराह खान हिने तीन मुलांना एकत्र जन्म दिला.
-
फिरूजा पारेख या आता नीता अंबानी यांच्या चांगल्या मैत्रीण झाल्या आहेत. इशा आणि आकाश यांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी नीता अंबानी यांनी अनंत यालाही जन्म दिला.
-
सर्व फोटो- सोशल मीडिया

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती