देशाचे नवे संसद भवन तयार होत असून ऑगस्ट २०२२ पर्यंत ही नवीन इमारत पूर्णपणे तयार होईल. १० डिसेंबर रोजी कोनशिला समारंभ पार पडला असून नवीन संसद भवन अत्यंत भव्य असेल. जगात असे अनेक संसद भवन आहेत जे नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. पाहुयात त्यांचे फोटो.. ब्रिटनच्या पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर संसद भवनाचा सोनेरी रंग आणि शाही लूक विशेष लक्ष वेधून घेतो. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर हा संसद भवन आहे. जगातील सर्वांत सुंदर संसद भवनांमध्ये श्रीलंकेच्या या संसद भवनाचा समावेश होतो. तलावाच्या मधोमध असलेला हा भवन सूर्यप्रकाशात चांदीसारखा चमकतो. जर्मनीचा संसद भवन त्याच्या निर्माण शैली आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे फक्त वर्षभरातच ही वास्तू उभारण्यात आली. रोमानियाचा संसद भवन अत्यंत मजबूत बनवण्यात आला आहे. या संसद भवनाच्या निर्माणासाठी २० हजार सैनिक आणि कैदी दिवसरात्र राबले. संगमरवराच्या या भवनावर जर दहशतवादी हल्ला झाला तर बाहेर पडण्यासाठी भवनात आठ भुयार बनवण्यात आले. फिनलँडचा संसद भवनसुद्धा अत्यंत सुंदर, आलिशान आणि मजबूत आहे. बांगलादेशाचे संसद भवन कृत्रिम तलावाच्या किनारी बांधण्यात आला आहे. १९६१ साली या भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल दहा वर्षे लागली. बाहेरून पाहिल्यास ही एकच इमारत दिसते. मात्र आत आठ इमारती एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. अमेरिकेचे वास्तूविशारद लुईस काह्न यांनी या संसद भवनाचा आराखडा तयार केला होता. सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती