-
अंबानी कुटुंबाबाबत सोशल मीडियावर चर्चा होत नाही असा एकही दिवस नसतो. भारतातील सर्वात श्रीमंत परिवारापैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या अगदी छोट्यात छोट्या गोष्टीपासून सगळं जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता असते. (सर्व फोटो- सोशल मीडिया)
-
गेल्या काही दिवसांत अंबानी कुटुंब एका सुखद कारणामुळे चर्चेत आहे.
-
१० डिसेंबरला अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आणि मुकेश व नीता अंबानी हे पहिल्यांदाच आजी-आजोबा झाले.
-
मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका यांनी ही गोड बातमी दिली. त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
नवजात बाळ आणि आई श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत गुरूवारी सांगण्यात आलं.
-
अंबानी कुटुंबाचा नवा पाहुणा कसा दिसतो याची साऱ्यांनाच उत्सुकता असतानाच मुकेश अंबानी यांचा आपल्या नातवासोबतचा फोटोदेखील व्हायरल झाला. राज्यसभेचे खासदार परिमल नाथवानी यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत त्यांचे अभिनंदन केले.
-
या फोटोनंतर एक अजून फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. मुकेश अंबानी यांच्या नातवाला पाहायला पंतप्रधान मोदी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या मजकूरासह सध्या एक फोटो व्हायरल होताना दिसतो आहे.
-
सोशल मीडियावर काही लोकांनी हा फोटो पोस्ट केला आहे. थंडीत कुडकुडणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला मोदींना वेळ नाही पण अंबानींच्या नातवाला भेटण्यासाठी मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत, अशा आशयाचा मजकूर या फोटोसह व्हायरल होताना दिसतो आहे.
-
काही पंजाबी युजर्सनेदेखील हा फोटो पंजाबी कॅप्शनसहित पोस्ट केला आहे आणि व्हायरल केला आहे. परंतु, या फोटोमागील सत्य काही वेगळंच असल्याचं निष्पन्न झालं.
-
सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांच्या दाढीची सध्याची ठेवण आणि या फोटोतील ठेवण यामुळे संशयाला जागा निर्माण झाली. त्यानंतर फोटोबाबत जेव्हा अधिक तपास करण्यात आला, तेव्हा असं निष्पन्न झालं की हा फोटो २०१४ साली काढण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी आणि उद्योजक मुकेश अंबानी हे HN रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी एकत्र आले असता हा फोटो क्लिक करण्यात आला होता. हा फोटो काही लोकांनी उलटा करून (MIrror Image) व्हायरल केला होता.
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार