रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत दाम्पत्य आहेत. या दोघांच्या लग्नाला जवळपास ३६ वर्षे झाली आहेत. शक्य झाल्यास मुकेश अंबानींची एक सवय नक्की बदलेन, असं नीता अंबानींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत नीता म्हणाल्या होत्या की, मुकेश अंबानी हे अत्यंत समजंस, दूरदृष्टी असलेले आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. पत्नी म्हणून तुम्ही त्यांना कोणता सल्ला देऊ इच्छिता असा प्रश्न नीता अंबानींना विचारला गेला. त्यावर त्यांना कोणताही सल्ला देण्यासाठी मी पात्र नाही असं त्या नम्रपणे म्हणाल्या. जर संधी मिळाल्यास तुम्हाला त्यांची कोणती सवय बदलायला आवडेल, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "तसं तर मुकेश अंबानी हे प्रत्येक बाबतीत परफेक्ट आहेत. पण तरी मला संधी मिळाल्यास मी त्यांच्या खाण्याची सवय बदलू इच्छिते." स्वादिष्ट व्यंजनांसाठी असलेलं त्यांचं प्रेम हे अनेकदा त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचं नीता अंबानींनी पुढे सांगितलं. मुकेश अंबानींच्या चटपटीत खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयीला बदलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
Aditya Thackeray: “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”, मराठी सणांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंची टीका