-
गेले काही दिवस महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री हा विषय बऱ्यापैकी गाजतोय. विविध कार्यक्रमांमध्ये पहिली मराठा महिला मुख्यमंत्री असा उल्लेख करत भाजपाचे नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अनेकदा चर्चा रंगत असतात. काही दिवसांपूर्वी पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी पुन्हा विषय छेडला गेला.
-
त्या कार्यक्रमात बोलताना भाजपा खासदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्राला कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच हे वक्तव्य करण्यात आल्यामुळे त्यांनी त्याच कार्यक्रमात याचं उत्तर दिलं.
-
सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात नव्हे तर केंद्राच्या राजकारणातच सक्रीय राहतील असं स्पष्ट करत शरद पवारांनीच या चर्चेवर पडदा टाकला. पण सुप्रिया सुळे यांनी मात्र याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही.
-
असं असतानाच सुप्रिया सुळे यांचा सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात व्यस्त आहेत पण चर्चा मात्र त्यांच्या मास्कची रंगली आहे.
-
सुप्रिया सुळे करोना काळात विविध प्रकारचे मास्क परिधान करताना दिसल्या. त्यातील काही मास्क एकाच रंगाचे, काही डिझायनर तर काही मास्क संदेश देणारे असे होते.
-
सध्या मात्र सुप्रिया सुळे यांचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात सुप्रिया सुळे यांनी संसदेचा फोटो असलेले मास्क परिधान केलेले आहे.
-
दिल्लीच्या संसदभवनात वावरताना हे मास्क लावणं यात काहीच नावीण्य नाही. अनेक नेतेमंडळी हे मास्क लावून ठिकठिकाणी भेटी देतात. पण मुंबईच्या कार्यालयात सुप्रिया सुळे आलेल्या असतानाही त्यांनी दिल्लीतील संसद भवनाचा फोटो असलेलं मास्क लावलं होतं.
-
सुप्रिया सुळे यांनी मुंबईत कार्यालयीन कामकाजासाठी आल्या असताना विविध मास्क वापरले. त्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे महाराष्ट्राचे करोनावर मात करण्याचे ब्रीदवाक्य असलेल्या मास्कचाही समावेश होता. पण गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंचे राजकीय भवितव्य केंद्रात की राज्यात अशी चर्चा सुरू आहे.
-
या चर्चा सुरू असतानाच मुंबईच्या कार्यालयात संसदभवनाचा फोटो असलेलं मास्क लावून येणं या सुप्रिया सुळेंच्या कृतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. आपलं केंद्रीय राजकारण आणि दिल्लीप्रेम या मास्कच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
-
दिल्ली की महाराष्ट्र असा प्रश्न सध्या सुप्रिया सुळेंच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनाही विचारला जात आहे. या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी शब्दांनी नव्हे तर मास्कने उत्तर देत आपली दिशा ठरवल्याची सध्या चर्चा आहे.
-
सर्व फोटो- सुप्रिया सुळे ट्विटर आणि सोशल मीडिया

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती