-
Mukesh Ambani Nita Ambani: मुकेश आणि नीता अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. गेली १० वर्षे अंबानी कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.
-
मुकेश अंबानी खूप मोठे उद्योगपती आहेत. ते सतत कामात व्यस्त असतात. पण तरीदेखील ते आपल्या कुटुंबासोबत भरपूर वेळ एकत्र घालवतात.
-
मुकेश आणि नीता अंबानी हे ८ मार्च १९८५ ला विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आता अंदाजे ३५ वर्षे झाली.
-
लग्नाला इतकी वर्षे उलटली असली, तरी मुकेश अंबानी अजूनही नीता अंबानींना घेऊन डेटवर जातात.
-
नीता अंबानी यांनी 'फेमिना'ला दिलेल्या मुलाखतीत स्वत: याबद्दलची माहिती सांगितली. "मुकेश अंबानी हे पती म्हणून खूपच चांगल्या स्वभावाचे आहेत. मी त्यांना माझे मेंटॉर आणि मार्गदर्शक मानते", असे नीता अंबानी मुलाखतीत बोलताना म्हणाल्या.
-
तुमच्या लग्नाला ३५ वर्षे होऊन गेली. अजूनही तुम्ही दोघं डेटवर जाता का? असा प्रश्न नीता अंबानींना विचारण्यात आला.
-
त्यावेळी त्या म्हणाल्या, "आमच्यामध्ये अजूनही पहिल्या दिवसाइतकंच प्रेम आहे आणि मुकेश मला आजही डेटवर घेऊन जातात."
-
नीता अंबानींनी सांगितल्याप्रमाणे, दिवसा जर त्यांना कुठे बाहेर जाण्याची इच्छा झाली तर मुकेश आणि नीता अंबानी भेल पूरी किंवा बटाटा पूरी खाण्यासाठी जातात. कारण दोघांनाही स्ट्रीट फूड आणि विशेषत: चाट खूप आवडतं.
-
"पण आमचे डेटचे प्लॅन अचानक बनतात. मुकेश अचानक रात्री मला सांगतात की चल आपण कॉफी प्यायला जाऊया आणि मग आम्ही कुलाब्याच्या ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये सी-लाऊंजला जातो", असं नीता यांनी सांगितलं.
-
सर्व फोटो- सोशल मीडिया
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO