-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार भाजपाशासित राज्य आणि भाजपाचे शासन नसलेले राज्य यांच्यात दुजाभाव करतं असा आरोप करत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.
-
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भली मोठी पोस्ट लिहिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारवर तोड डागली.
-
रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये विविध मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडत त्यांच्या सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.
-
जीएसटी आणि केंद्राकडून कर्ज या बाबींकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं. अटीशर्तींसह राज्यांना कर्ज मंजूर करणे म्हणजे 'पैसे उसने देतो पण सामान माझ्याच दुकानातून घ्यायचं' असला प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं.
-
"केंद्राने जीएसटी परिषदेच्या माध्यमातून सर्व संमतीने योग्य निर्णय घेतले असते, तर कदाचित जीएसटी परिषदेसारख्या आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रातही परिषदा स्थापन करून अधिक प्रभावशाली धोरणं आखता आली असती", याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
-
याच फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी कुटुंब, आई आणि भावंडं अशा गोष्टींचा उल्लेख केला.
-
"राजकीय हित साधण्यासाठी आपल्या देशात राज्यांच्या हक्कांवर या ना त्या प्रकारे अतिक्रमण करत सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं काम केंद्र सरकारकडून होत असल्याचं दिसतंय", असे ते म्हणाले.
-
"ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही त्याठिकाणी CBI किंवा ED या संस्थांचा कशाप्रकारे राजकीय गैरवापर केला जात आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही", असं म्हणत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा पुनरूच्चार केला.
-
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, "समजा कुटुंबात तीन चार लहान भावंडं असतील, तर त्यांच्यात भांडणं होऊ नये यासाठी आईने मोठ्या भावाला काही अधिकार दिलेले असतात. मोठ्या भावाने त्या अधिकारांचा वापर करून लहान भावामध्ये सौख्य कसं नांदेल आणि सर्वांना सर्व गोष्टी मिळतायत की नाही याची दक्षता घेणं अपेक्षित असतं."
-
"परंतु जर मोठा भाऊ अधिकारांचा गैरवापर करणार असेल किंवा लहान भावंडांना वागणूक देतांना भेदभाव करणार असेल तर मग अशा वागणुकीने संपूर्ण कुटुंब दुःखी होतं आणि आईच्या विश्वासाला तडा जातो", अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर राज्याराज्यांत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. (सर्व फोटो सौजन्य- रोहित पवार, नरेंद्र मोदी फेसबुक पेज)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती