-
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या जोडीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लग्न केल्यानंतर या जोडीने लग्नाऐवजी त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
"सर्व काही अगदी सुंदर होते" असं म्हणत धनश्रीने युजवेंद्रसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये धनश्री आणि युजवेंद्र त्यांच्या एंगेजमेंट रिंगकडे पाहत आहेत.
-
लग्नातील प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी या दोघांचा प्रयत्न असून त्यांनी खास फोटोसाठी ही पोझ दिल्याचं दिसून येत आहे.
-
धनश्री एक लोकप्रिय युट्यूबर असून तिचे जवळपास १.५ मिलिअन फॉलोअर्स असल्याचं सांगण्यात येतं.
-
धनश्री सोबत चहलची ओळख लॉकडाउन काळात झाली.
-
या ओळखीचं रुपांत प्रेमात झालं आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली.
-
आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठिंबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती.
-
युजवेंद्र आणि धनश्रीचा एक सुंदर फोटो.
-
गुरुग्राम येथील कर्मा लेक रिसॉर्ट येथे या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर दोघांनीही ही गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. (All Photos: The Wedding Story/Instagram)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती