-
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना, कोव्हॅक्सीन लस चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत.
-
कोव्हॅक्सीन ही भारताची पहिली स्वदेशी लस आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने आयसीएमआर सोबत मिळून या लसीची निर्मिती केली आहे.
-
कोव्हॅक्सीनबद्दलचा निष्कर्ष सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कोव्हॅक्सीन लसीचा डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल्सची निर्मिती होते.
-
संग्रहीत
-
कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज सहा ते बारा महिने टिकू शकतात असे लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकमधील वैज्ञानिकांनी रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे.
-
करोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटीनशी लढण्यात या अँटीबॉडीजचा रोल महत्त्वाचा असणार आहे. कोव्हॅक्सीन फेज एक आणि दोन चाचण्यांमधील निष्कर्ष 'medRxiv’ वर अपलोड करण्यात आले आहेत.
-
कोव्हॅक्सीनचे वैशिष्टय म्हणजे लहान मुलांवर या लसीचा काय परिणाम होतो, ते सुद्धा तपासण्यात आले आहे. अशा प्रकारची चाचणी होणारी कोव्हॅक्सीन जगातील पहिली लस असू शकते.
-
सप्टेंबर महिन्यात ही चाचणी सुरु झाली होती. फायझरने १२ वर्ष वयाच्या मुलांवर ऑक्टोबरमध्ये तर मॉर्डनाने डिसेंबर महिन्यात या वयोगटातील मुलांसाठी नोंदणी सुरु केली.
-
संग्रहीत
-
सिरमसोबत भारत बायोटेकनेही लसीच्या आपातकालीन वापराचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. पण त्यांना चाचणी संदर्भात आणखी माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती