-
अंबानी कुटुंबाबाबत सोशल मीडियावर चर्चा होत नाही असा एकही दिवस नसतो. भारतातील सर्वात श्रीमंत परिवारापैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या अगदी छोट्यात छोट्या गोष्टीपासून सगळं जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता असते.
-
गेल्या काही दिवसांत अंबानी कुटुंब एका सुखद कारणामुळे चर्चेत आहे. १० डिसेंबरला अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आणि मुकेश व नीता अंबानी हे पहिल्यांदाच आजी-आजोबा झाले.
-
मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका यांनी ही गोड बातमी दिली. त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
नवजात बाळ आणि आई श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत गुरूवारी सांगण्यात आलं.
-
अंबानी कुटुंबाचा नवा पाहुणा कसा दिसतो याची साऱ्यांनाच उत्सुकता असतानाच मुकेश अंबानी यांचा आपल्या नातवासोबतचा फोटोदेखील व्हायरल झाला. राज्यसभेचे खासदार परिमल नाथवानी यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत त्यांचे अभिनंदन केले.
-
त्यानंतर अंबानी कुटुंब या नातवाचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता साहजिकच साऱ्यांना होती.
-
आकाश आणि श्लोका यांच्या मुलाच्या बारशाची एक निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. त्यात आकाश अंबानी यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
-
अंबानी कुटुंबातील नव्या पाहुण्यासाठी विविध नावांची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण नुकताच या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
-
आकाश आणि श्लोकाने यांनी त्यांच्या मुलाचं नाव पृथ्वी असं ठेवलं आहे. अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आहे. त्यामुळे त्याची साधर्म्य असणारं नाव म्हणून पृथ्वी हे नाव ठेवल्याचं बोललं जात आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)
-
<a href="https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/2347387/nita-ambani-mukesh-ambani-huge-kingdom-antilia-know-how-much-salary-cleaning-staff-gets-unknown-facts-vjb-91/" target="_blank" rel="noopener">मुकेश अंबानींच्या घरी साफसफाई करणाऱ्या नोकराचा पगार माहित्ये का? जाणून घेण्यासाठी क्लिक करा.</a>

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती