-
करोना संकटानं ग्रासलेलं २०२० वर्ष आता शेवटच्या औटघटका मोजत आहे. दोन दिवसांत हे वर्ष निरोप घेईल आणि नव्या वर्षाचा उदय होईल. (Express photo: Amit Chakravarty)
-
भीती, निराशा, दुःखाने व्यापून गेलेल्या या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. (Express photo: Javed Raja)
-
नव्या वर्षात मुंबई पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुसाट धावेल, या आशेत मुंबईकरही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, याची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
-
महाराष्ट्र सरकारने मुंबईत पाच जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले मुंबई पोलीसही यंदा विशेष सतर्क असणार आहेत.
-
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
-
“नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच कोविड-१९ नियमांचे काटेकोटरपणे पालन होतेय की, नाही त्यावर तैनात पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल” असे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
-
बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येईल असे नागरे पाटील यांनी सांगितले. (Express photo: Javed Raja)
-
छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथक तैनात असेल. घातपाताचा धोका लक्षात घेऊनही मुंबई पोलीस सज्ज आहेत. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच ड्रींक अँड ड्राइव्ह विरोधात वाहतूक पोलीस दरवर्षीप्रमाणे मोहिम राबवतील.
-
“नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही” असे नागरे पाटील म्हणाले. (Express photo by Nirmal Harindran)
-
“निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया. मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण छोटया गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत” असे नांगरे पाटील म्हणाले.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती