-
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना 'ईडी'ने नोटीस बजावली. HDIL आणि तत्सम बड्या कंपनीतील काही आर्थिक व्यवहारांमध्ये वर्षा यांचे नाव आल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
संग्रहीत
-
मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसल्यानंतर आता भाजपाच्या नेत्यांनीही राऊतांवर हल्लाबोल केल्याचं चित्र आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून ते माजी खासदार निलेश राणेंपर्यंत साऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. पाहूया कोणता नेता नक्की काय म्हणाला?
-
“वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते एचडीआयएल (वाधवान बंधू), एचडीआयएल ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधुरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत… गेल्या काही महिन्यांत 'ईडी'कडून तीन नोटीस… पण उत्तर नाही… का? लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल”- भाजपा नेते किरीट सोमय्या
-
“प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!,”- भाजपा आमदार आशिष शेलार
-
“कार्यकरींनी ७०० शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्द भांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. (त्यापेक्षा) दोन ओळी त्या ५५ लाखांबद्दल खरडल्या असत्या, तर विषय संपला असता. अर्णबवर कारवाई होते तेव्हा ‘कायदा त्याचे काम करत होता’ आणि आता?”- भाजपा नेते अतुल भातखळकर
-
“सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जाते. सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा,”- भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
-
“स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत ‘सामना’ एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेसने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला. नोटीशीला घाबरायचं काय कारण? पण जर घाबरत असाल, तर कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की."- भाजपा नेते राम कदम
-
“माझं असं म्हणणं आहे की चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही. नीट जाऊन त्याला उत्तर देता येतं. नोटीस कुणाला मिळाली? कुणाली नाही मिळाली? हे मला माहिती नाही. कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही.”- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
-
“संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.. शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने??" – माजी खासदार निलेश राणे

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती