-
पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या 'कोव्हिशिल्ड' या करोना प्रतिबंधक लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास सरकारने परवानगी दिली आहे.
-
आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबरोबरच धोका असलेल्या गटातील नागरिकांना लसीकरणामध्ये पहिले प्राधान्य देण्यात येणार आहेच.
-
पण त्याच बरोबर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही लस लवकरच उपलब्ध होईल.
-
खासगी रुग्णालये आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी मार्च पर्यंत 'कोव्हिशिल्ड' लस उपलब्ध होईल, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले.
-
सीरमकडून सुरुवातीला फक्त सरकारलाच या लसीचा पुरवठा केला जाईल. सीरमला खासगी बाजारात ही लस विकता येणार नाही.
-
-
-
खासगी बाजारात या लसीची किंमत १ हजार रुपये असेल. ऑर्डर मिळाल्यानंतर सात ते दहा दिवसात पुरवठा सुरु होईल.
-
संग्रहीत
-
सीरमकडे आता पाच कोटी करोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. अदर पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुढील सात ते दहा दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि आम्ही एका महिन्यात सात ते आठ कोटी लसींची पुरवठा करण्यासाठी निर्मिती करु”.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती