-
-
संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या करोना व्हायरसला रोखणाऱ्या करोना प्रतिबंधक 'कोव्हिशल्ड' लसीची निर्मिती सीरमकडून सुरु आहे.
-
सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरमची लस कधी येते? आणि कधी जनजीवन पूर्वपदावर येणार, याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या बरोबरीने या कंपनीचे सीईओ अदर पूनावाल यांच्या खासगी जीवनाबद्दलही चर्चा सुरु आहे.
-
अदर पूनावाला यांची पत्नी नताशा सुद्धा मीडियामध्ये चर्चेत आहे. जाणून घेऊया नताशा पूनावाला यांच्याबद्दल काही खास गोष्टी. (सर्व फोटो सौजन्य – नताशा पूनावाला इन्स्टाग्राम)
-
नताशा पूनावाला सुद्धा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये एक्झीक्यूटिव संचालक आहे. नताशा पूनावाल एक सोशल सेलिब्रिटी सुद्धा आहे.
-
नताशा पूनावालाचा जन्म १९८१ साली पुण्यात झाला. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्या परदेशात निघून गेल्या.
-
इंग्लंडच्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये नताशा यांनी मास्टर्सची पदवी घेतली. इथे त्यांची अदर पूनावाला यांच्याबरोबर पुन्हा भेट झाली. त्याआधी गोव्यात विजय मल्ल्या यांच्या पार्टीमध्ये अदर पूनावाला यांच्या बरोबर पहिली भेट झाली होती.
-
लंडनमध्ये पुन्हा भेट झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले.काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २००६ मध्ये लग्न केले.
-
अदर आणि नताशा पूनावाला यांना दोन मुले आहेत. सायरस आणि दारियस पूनावाला अशी त्यांची नावे आहेत.
-
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, नताशा पूनावाला हा पेज थ्री पार्टीमधला चर्चित चेहरा आहे. अनेक मोठया कलाकारांसोबत पार्टीमध्ये त्या सहभागी होतात.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती