-
लोकसत्ता, रवींद्र जुनारकर (चंद्रपूर)- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहकुटुंब व्याघ्र पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. बफर क्षेत्रातील अलिझंझा प्रवेशद्वारावरून दुपारी ३ वाजता सचिनने व्याघ्र सफारीचा आनंद लुटला.
-
सचिन २५ जानेवारीला सचिन, त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन व मुलगी सारा यांच्यासोबत व्याघ्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. चिमूर वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रातील अलिझंझा प्रवेशद्वारावरून सचिनने दुपारच्या सत्रात प्रवेश केला आहे. सचिन चार दिवस ताडोबात राहून व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटणार आहे.
-
विशेष म्हणजे, सचिन गेल्या वर्षी २४ जानेवारीला ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला होता. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा ताडोबामध्ये कुटुंबीयांसह तो आल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
-
दरम्यान, सचिन तेंडुलकर यांचे ताडोबा प्रकल्पात वनाधिकारी यांच्यासोबतच चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागतही केले आहे.
-
ताडोबा बफर झोनमध्ये सहकुटूंब व्याघ्र सफारीचा आनंद लुटणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आज तीन वाघ, एक बिबट आणि एका अस्वलाचे दर्शन झाले. व्याघ्र दर्शनाचा मनसोक्त आनंद लुटत तेंडूलकर कुटूंबीय सायंकाळी सफारीवरून रिसोर्टमध्ये परतले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना दिली.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती