-
राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका करताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोपही खासदार राणा यांनी केला. त्यामुळे नवनीत राणा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी.. (All Photos: navneetravirana instagram)
-
नवनीत यांचा जन्म मुंबईमध्ये झाला.
-
त्यांना लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती.
-
त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
-
त्यावेळी त्यांनी मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे शिक्षण घेतले
-
तसेच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली.
-
त्यांनी पंजाबी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबचे आहेत.
-
१२वीची परिक्षा दिल्यानंतर नवनीत या एका म्यूझिक व्हिडीओमध्ये मॉडेल म्हणून दिसल्या होत्या.
-
त्यांनी कन्नड चित्रपटात काम करत फिल्मी करिअरला सुरुवात केली.
-
त्यानंतर त्यांनी 'चेतना' (2005), 'जगपति' (2005), 'गुड बॉय' (2005), आणि 'भूमा' (2008) या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले.
-
या चित्रपटांनी नवनीत राणा यांना लोकप्रियता मिळवून दिली.
-
एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर नवनीत यांनी २०११ मध्ये बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी सामूहिक विवाह सोहळयात लग्न केले आणि त्या स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या.
-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात पराभूत झाल्या होत्या.
-
याच निवडणुकीपासून त्यांचे शिवसेनेसोबतचे वैर सुरू झाले.
-
गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले. अडसूळ यांचा पराभव करून त्या लोकसभेत पोहोचल्या आणि लगेच त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिले, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठा धक्का होता.
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य