-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए दुसऱ्यांदा सत्तेत आली. दुसऱ्यांदा सत्तेत येऊन सरकारला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारचं मूल्यमापन करणारं एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं. यात करोनाशी संबंधित परिस्थितीवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सहभागी नागरिकांनी आपली मतं नोंदवली.
-
सर्वेक्षणात ‘करोना महामारीची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार यशस्वी झालंय असं वाटतं का?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सहभागी नागरिकांनी सरकार करोना परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झालं नाही म्हणजेच अपयशी ठरलं असल्याचं म्हटलं आहे. ६२.४ टक्के नागरिकांनी हे मत मांडलं आहे. तर ३४.३ टक्के लोकांनी सरकार परिस्थिती हाताळण्यात यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. ३.३ लोकांनी तटस्थ भूमिका मांडली आहे.
-
करोनाच्या दुसऱ्या लाटेतच लस तुटवड्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला. याच्याशी संबंधित ‘लसींच्या तुटवड्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असं वाटतं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ६३.३ टक्के लोकांनी मोदी सरकार लस तुटवड्यासाठी जबाबदार धरलं आहे. तर ३४.६ टक्के लोकांनी लस तुटवड्याला मोदी सरकार जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. तर २.१ टक्के लोकांनी मात्र, तटस्थ भूमिका मांडली आहे.
-
सर्वेक्षणात ‘मोदी सरकारने करोनापेक्षा विधानसभा निवडणुकांना जास्त महत्त्व दिलं असं वाटतं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ७०.५ टक्के लोकांनी सरकारने करोनाच्या परिस्थितीपेक्षा विधानसभा निवडणुकांना अधिक महत्त्व दिल्याचं म्हटलं आहे. २६ टक्के लोकांनी मात्र, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिलं आहे. करोनापेक्षा निवडणुकांना अधिक महत्त्व दिलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर ३.५ टक्के लोकांनी यावर तटस्थ भूमिका मांडली आहे.
-
पश्चिम बंगाल निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मोदींचा करीश्मा घटलाय असं वाटतं का ? हा प्रश्नही वाचकांना विचारण्यात आला होता. यावर तब्बल ५३.४ टक्के वाचकांनी हो असं मत नोंदवलं असून ४१.१ टक्के वाचकांनी नकार दिला आहे. तर ५.५ टक्के वाचक तटस्थ राहिले आहेत.
-
वाचकांना आज लोकसभा निवडणूक झाली तर मोदी सरकारला ५४३ पैकी किती जागा मिळतील? असं विचारण्यात आलं होतं. यावर २३.७ टक्के वाचकांनी मोदी सरकारला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असं मत नोंदवलं आहे. तर २९.७ टक्के वाचकांनी मोदी सरकारला १०० ते २०० दरम्यान जागा मिळतील असं सांगितलं आहे. तसंच १७.८ टक्के वाचकांनी मोदी सरकार २०१ ते ३०० दरम्यान जागा मिळवण्यात यशस्वी होईल असं सांगितलं आहे. मत नोंदवणाऱ्यांपैकी एकूण २३.६ टक्के वाचकांनी मोदी सरकारला ३०१ ते ४०० दरम्यान जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर फक्त ५.२ टक्के वाचकांनी ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे २०० पेक्षाही कमी जागा मिळतील असं मत व्यक्त करणाऱ्यांचं प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक आहे. २०० पेक्षा कमी जागा मिळतील असे दोन पर्याय निवडणाऱ्या वाचकांची एकत्रित संख्या ५३.४ टक्के इतकी आहे.
-
या सर्वेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोदी सरकारने ७ वर्षांमध्ये कोणते निर्णय बरोबर घेतले आणि कोणते निर्णय चुकीचे घेतले असा प्रश्न विचारण्यात आला होता. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं मत ७ हजार २३८ म्हणजेच ६२.९ टक्के लोकांनी नोंदवलं आहे. तर ३००३ म्हणजेच २६.१ टक्के लोकांनी हा निर्णय योग्य असल्याचा पर्याय निवडला आहे. इतरांनी तटस्थ पर्यायाचा स्वीकार केलाय.
-
सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ११ हजार ५१४ जणांपैकी ६ हजार ८३६ म्हणजेच ५९.४ टक्के लोकांनी तिहेरी तलाक रद्द करणारा कायदा संमत करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचा पर्याय निवडला आहे. त्याउलट फक्त १ हजार ०३६ लोकांनी तो अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
-
राष्ट्रीय आपत्तीसारख्या करोना परिस्थितीत मोदी सरकारने समाधानकारक काम केलं नसल्याचंही या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. ‘करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात मोदी सरकारला १०० पैकी किती गुण द्याल?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ५४.३ टक्के लोकांनी ३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण दिले आहेत. तर १० टक्के लोकांनी ३५ ते ५० टक्के गुण दिले आहेत. ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान गुण देणाऱ्यांची संख्या १२.८ टक्के आहे, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण देणाऱ्यांची संख्या २२.८ टक्के आहे.
-
या सर्वेक्षणामध्ये मोदी आणि शाह यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी व अमित शाह हे दोघेच सरकार चालवतात व अन्य नेत्यांना फारसं महत्त्वाचं स्थान नाही हा आरोप पटतो का?, या प्रश्नाला उत्तर देताना ६४.६ टक्के वाचकांनी हा आरोप योग्य असल्याचं मत नोंदवलं आहे. ११,५१४ जणांपैकी ७ हजार ४३३ जणांनी होय मोदी आणि शाह दोघेच सरकार चालवतात आणि अन्य नेत्यांनी फारसं महत्वाचं स्थान नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावर नाही मत नोंदवण्याची टक्केवारी ३३ (३ हजार ८०१ मतं) तर तटस्थ म्हणून मत नोंदवणाऱ्यांची संख्या २.४ टक्के (२८० मतं) इतकी आहे.
-
सर्वेक्षणामध्ये ‘तुमच्या मते भाजपाचा कुठला नेता पंतप्रधान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर उत्तर देताना ५४.७ टक्के म्हणजेच ११,५१४ जणांपैकी ६ हजार ३०० जणांनी गडकरी हे सर्वोत्तम निवड असल्याचं मत नोंदवलं. त्या खालोखाल ३२.३ टक्के वाचकांनी नरेंद्र मोदी तर ०.७ टक्के वाचकांनी अमित शाह योग्य ठरतील असं मत व्यक्त केलं. मोदींना ३ हजार ७१९ जणांनी पसंती दिली तर शाह यांना केवळ ७७ जणांनी मत दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे गडकरी, मोदी, शाह यांच्यापैकी कोणताही नेता योग्य नसल्याचं मत नोंदवणाऱ्यांची संख्या १२.३ टक्के होती. एक हजार ४१८ जणांनी या तिघांपैकी कोणताही भाजपाचा नेता पंतप्रधान म्हणून चांगला नसल्याचं मत नोंदवलं.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती