-
सोनिया गांधी या फक्त काँग्रेस अध्यक्ष नसून भारतीय राजकारणातली एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. गेल्या ३० वर्षांपासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी आपल्या विरोधकांसोबत आपले संबंध कायम चांगलेच ठेवले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचं नातं आपुलकीचं होतं.
-
सोनिया यांनी वाजपेयींवर कठोर शब्दांत टीका केली असली तरी त्या वाजपेयींचा कायमच आदर करत असत. वाजपेयीही सोनिया यांच्याबद्दल आदर बाळगून होते.
-
१३ डिसेंबर २००१ रोजी जेव्हा संसद भवनावर हल्ला झाला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तर सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या होत्या.
-
हल्ल्याच्या पूर्वीच सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्याने सोनिया गांधी आणि वाजपेयी दोघेही सभागृहातून बाहेर पडले होते.
-
हल्ला झाला तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि काही मंत्र्यांसोबत जवळपास २०० लोक सभागृहात होते.
-
सोनिया गांधींना घरी पोहचल्यावर टीव्हीच्या माध्यमातून कळलं की संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आहे. हे कळताच त्यांनी आधी वाजपेयींना फोन केला.
-
सोनिया यांनी वाजपेयींना विचारलं की, तुम्ही ठीक आहात ना? तर त्याला उत्तर देत वाजपेयी म्हणाले, माझं जाऊदे, तुम्ही सांगा, तुम्ही ठीक आहात ना?
-
या हल्ल्यामध्ये संसद भवनाचे सुरक्षारक्षक तसंच दिल्ली पोलिसांसह एकूण ९ लोक शहीद झाले होते. सर्व फोटो सौजन्यः पीटीआय आणि इंडियन एक्स्प्रेस
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती