-
पिंपरी चिंडवडच्या धनाजी लांडगे आणि गिरीजा लांडगे या बाप-लेकीच्या जोडीने, युरोपातील उणे २५ ते ४० डिग्री तापमान असलेले ५,६४२ मीटर उंचीचे माउंट एलब्रुज शिखर सर केले आहे. वयाच्या १२ व्या वर्षी अशी कामगिरी करणारी गिरीजा ही पहिलीच भारतीय मुलगी ठरली आहे.
-
युरोपातील माउंट एलब्रूज हे हिमशिखर सर करणं सोपं नसून त्यासाठी अत्यंत खडतर परिश्रम घ्यावे लागतात. धनाजी आणि गिरीजा लांडगे यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. युरोपातील आणि भारतातील हवामान यात मोठ्या प्रमाणात फरक असून त्याच्याशी जुळवून घेत या बाप लेकीच्या जोडीने हा पराक्रम करून दाखवला आहे.
-
माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते. ‘माउंट एल्ब्रुस‘ सर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, मेहनत आवश्यक असते
-
गिर्यारोहकांच्या मनाचा अंत पाहणारा पर्वत म्हणून याला ओळखले जाते. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणाचा प्रसंगी सामना करावा लागतो. येथील वातावरण सतत बदलते असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी करुनच या मोहिमेची निवड करावी लागते.
-
या शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातील पहिलीच मुलगी आहे. एकूण १० दिवसांच्या मोहिमेत दोघांनी वातावरणाशी समतोल राखण्यासाठी २२ ते २५ तारखेपर्यंत ३१०० मीटर, ३८०० मीटर आणि मग ४८०० मीटर उंचीवर सराव केला.
-
२६ तारखेला पहाटे तीन वाजता शिखर चढाईला सुरुवात केली, आणि सकाळी सात वाजता शिखर समिट सक्सेस केले. १५ तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वातावरण खूपच खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट यशस्वी झाले नाही. ५६४२ मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस झाले
-
हे शिखर सर करणारी गिरिजा पहिली मुलगी असून पहिल्यांदाच बाप- लेकीच्या जोडीने हा पराक्रम केला आहे. या मोहिमेतून गिरिजाने ‘लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा ‘ हा संदेश दिला आहे. तिची ही मोहीम तिने सर्व मुलींना आणि आजोबांना समर्पित केली आहे.
-
गिरीजाने आत्तापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर सुळका, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ६५ किल्ल्यांवर भटकंती केली आहे.
-
गिरीजाच्या लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यंगेस्ट माउंटेनिअर म्हणून नोंद झालेली आहे.
-
२०१८ मध्ये बालदिनी गिरीजाने वयाच्या ९ व्यावर्षी शहापूरजवळील वजीर सुरळा सर केला होता. या सुळक्याची उंची ही ६०० फूट आहे.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”