-
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात विवाहाचा क्षण खूप खास असतो. लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य पूर्णपणे बदलते. नवीन नातेसंबंधांबरोबरच त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही मुलीच्या खांद्यावर येते. लग्नापूर्वी वधूच्या घरात बांगड्या भरणे, हळद, मेहंदी आणि संगीत यासारखे अनेक विधी होतात.
-
भारतीय परंपरेनुसार, लग्नाच्या दोन तीन आठवड्यांपूर्वी वधूच्या हातात बांगड्या घालण्याचा विधी असतो. 'पहिले कंगण सौभाग्याचे भूषण', असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो.
-
"कंकण' हे सौभाग्याचे भूषण मानले जाते. लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घातल्या जातात त्याला वज्रचुडा म्हणतात. बांगड्या हा सौभाग्य अलंकार मानला जातो.
-
लग्नाच्या वेळी घातला जाणारा चुडा हिरव्या रंगाचा असतो. तर काही ठिकाणी तो लाल रंगाचा असतो.
-
महिलांच्या अलंकारांमध्ये बांगडीचे वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मात बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले जातात.
-
वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे महत्त्वही वेगवेगळे असते. लाल रंगाची बांगडी ही प्रेमाचे प्रतिक असते. तर हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक मानले जाते.
-
निळा रंग हा ज्ञानाचा, पिवळा रंग आनंदाचा, नवीन सुरुवातीसाठी पांढरा रंग, केशरी रंग यशाचा मानला जातो.
-
तर ताकदीसाठी चांदीच्या आणि समृद्धीसाठी सोन्याच्या बांगड्या वापरल्या जातात.
-
बदलत्या काळानुसार फॅशन बदलली आहे. पूर्वी मुली या फक्त हिरव्या आणि लाल बांगड्या घालत होत्या. मात्र आता त्यासोबत विविध रंगबेरंगी बांगड्याही घातल्या जातात.
-
धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. बांगड्यांच्या किणकिणाटाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते.

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!