-
करोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबईच्या लोकलमधून प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी, ८ ऑगस्ट रोजी केली. त्यानंतर मुंबई लोकलचा ई-पास कसा काढायचा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया करोना प्रतिंबधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर ई-पास कसा काढायचा?
-
https://epassmsdma.mahait.org ही लिंक ओपन करा
-
"Travel Pass for Vaccinated Citizens" यावर क्लिक करा
-
कोविड लसीकरणासाठी नोंदवलेलाच मोबाइल क्रमांक नमूद करा
-
मोबाइलवर ओटीपीचा मेसेज येईल
-
मोबाईलवर आलेला ओटीपी टाका
-
ओटीपी टाकल्यानंतर नाव, मोबाइल क्रमांक, संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील दिसतील
-
त्यामध्ये Generate Pass या पर्यायावर क्लिक करा
-
यानंतर 'सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये स्वत:चे छायाचित्र अपलोड करा
-
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करता मेसेजवर लिंक प्राप्त होईल.
लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाइलमध्ये सेव्ह करा -
यानंतर रेल्वे स्थानकांवर जाऊन त्याआधारे रेल्वे पास मिळवता येईल.

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!