-
आपण अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला काही कारखाने पाहतो. या कारखान्यांच्या छतांवर स्टेनलेस स्टीलची घुमटवजा वस्तू फिरताना दिसते.
-
सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चमकदार दिसणारे हे घुमट फिरताना फार चांगले दिसतात. पण हे घुमट छतावर लावण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं असतात.
-
अनेक कारखान्यांच्या छतावर बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे छोट्या घुमटाप्रमाणे दिसणाऱ्या या गोष्टीला टर्बो व्हेंटिलेटर (Turbo Ventilator) असे म्हणतात.
-
काही ठिकाणी याला एअर व्हेंटिलेटर (Air Ventilator), टर्बाइन व्हेंटिलेटर (Turbine Ventilator), रुफ एक्सट्रॅक्टर (Roof Extractor)अशा विविध नावानेही ओळखले जाते.
-
काही ठिकाणी टर्बो व्हेंटिलेटर कारखाने आणि मोठ्या दुकानांच्या छतावर लावले जातात. तर काही भागात रेल्वे स्थानकांच्या छतावरही हे व्हेंटिलेटर पाहायला मिळतात.
-
टर्बो व्हेंटिलेटरचे पंखे हे मध्यम गतीने चालतात.
-
टर्बो व्हेंटिलेटरचे मुख्य काम हे कारखान्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील गरम हवा बाहेर फेकणे हे असते.
-
टर्बो व्हेंटिलेटरद्वारे कारखान्यातील गरम हवा बाहेर फेकली जाते. तर त्याचवेळी खिडकी किंवा दरवाज्यामधून नैसर्गिक वारा कारखान्यात खेळता राहतो.
-
टर्बो व्हेंटिलेटर हे बराच काळ टिकतात. यामुळे कारखान्यात काम करणाऱ्यांना उकाड्याचा त्रास होत नाही.
-
विशेष म्हणजे टर्बो व्हेंटिलेटर गरम हवा बाहेर फेकण्यासोबतच कारखान्यातील दुर्गंध बाहेर टाकण्याचे काम करतो.
-
इतकंच नव्हे तर हवामान बदलानंतर ते आतील आर्द्रताही बाहेर फेकते.

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!