-
रक्षाबंधन म्हणजे भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण… रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते.
-
तसेच त्याला दीर्घ आयुष्य आणि सुख लाभू दे यासाठी प्रार्थना करते. तर त्याचवेळी भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. मात्र हल्ली बदलत्या ट्रेंडनुसार काही बहिणीही भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट देतात.
-
पण अनेकदा भावाला काय गिफ्ट द्यायचं, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र तुम्ही तुमच्या भावाचा स्वभाव बघून त्याला काही खास गिफ्ट देऊ शकता.
-
संयमी स्वभाव असलेला भाऊ- जर तुमचा भाऊ शांत आणि संयमी स्वभावाचा असेल. जर तो तुमचे सर्व ऐकत असेल आणि तुम्हाला योग्य सल्लाही देत असेल तर तुम्ही त्याला एखादे इलेक्ट्रॉनिक गॅजेट गिफ्ट करु शकता.
-
एखादे छान हेडफोन किंवा डिजीटल घड्याळ ही गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहेत.
-
प्रोत्साहन देणारा भाऊ – जर तुमचा भाऊ तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असेल तर तुम्हीही यंदाच्या रक्षाबंधनावेळी त्याला काही तरी स्पेशल गिफ्ट देऊ शकता. अशाप्रकारच्या स्वभाव असलेल्या व्यक्तींसाठी एखादे छान पुस्तक किंवा ग्रुमिंग किट तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
-
काळजी घेणारा भाऊ – जर तुमचा भाऊ तुमची नेहमी काळजी घेत असेल तर यंदा त्याची काळजी घेणारे एखादी वस्तू तुम्ही त्याला भेट म्हणून देऊ शकता. एखादा छान कॉफीचा कप, पेन स्टँड तुम्ही गिफ्ट करु शकता.
-
भावनिक स्वभाव असलेला भाऊ – जर तुमच्या भावाचा स्वभाव भावनिक असेल तर तुम्ही त्याला एखादी छानसी भेटवस्तू देऊ शकता. अशा स्वभावाचे भाऊ नेहमी बहिणीचे दुःख, वेदना आणि आनंद समजून घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याला एखादी फोटोफ्रेम किंवा उशी गिफ्ट करु शकता.
-
खोडकर भाऊ – जर तुमचा भाऊ दिवसभर तुमच्या खोड्या काढत असेल तर तुम्ही त्याची खोडी काढणारी एखादी भेटवस्तू त्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”