-
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे कुटुंबातील सर्वच जण राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.
-
ज्योतिरादित्य शिंदेपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेक जण हे राजकारणात मोठमोठ्या पदावर काम करतात.
-
तर दुसरीकडे याच कुटुंबात अनेक सदस्य हे सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. यातील एक नाव म्हणजे मृगांका कुमारी सिंह.
-
मृगांका ही माधवराव शिंदे यांची नात असून ती एकुलती एक मुलगी चित्रांगदा सिंह यांची मुलगी आहे.
-
ज्योतिरादित्य शिंदे यांची बहिण चित्रांगदा हिचा विवाह काश्मीरमधील एका राजघराण्यात झाला.
-
चित्रांगदा यांच्या पतीचे नाव विक्रमादित्य सिंह. ते काँग्रेस नेते करण सिंह यांचे नातू आहेत. विक्रमादित्य सिंह यांनी जम्मू -काश्मीर विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
-
चित्रांगदा आणि विक्रामादित्य यांना दोन मुलं आहेत.
-
त्यांची मोठी मुलगी मृगांका कुमारी सिंह हिचा नुकताच विवाह संपन्न झाला.
-
मृगांकाचे लग्न पटियालातील राजघराण्यात झाले आहे.
-
मृगांका सिंहच्या पतीचे नाव निर्वाण सिंह असे आहे.
-
निर्वाण सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे नातू आहेत.
-
मृगांकाचे वडील विक्रमादित्य जम्मू -काश्मीर पोलो असोसिएशनचे संस्थापक आहेत. मृगांकाही तिच्या वडिलांप्रमाणे एक उत्कृष्ट पोलो खेळाडू आहे.
-
मृगांका सिंह हिने अनेक ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम केले आहे.
-
तसेच दिल्लीतील अनेक फॅशन शोमध्ये तिने मॉडेलिंगही केले आहे.
-
मृगांकाची सासू जय इंदर कौर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मुलगी आहे. तर तिच्या सासऱ्याचे नाव सरदार गुरुपाल सिंह संधू असून ते दिल्लीतील व्यापारी आहेत.
-
तिचे लग्न काही महिन्यांपूर्वी झालं असलं तरी अजूनही या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!