-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. (फोटो ANI)
-
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे. माझा आनंद आज द्विगुणीत झाला आहे. पूर्वांचलच्या लोकांप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याचा हा क्षण आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. (फोटो ANI)
-
कुशीनगर विमानतळ हे उत्तर प्रदेशमधील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मोदी म्हणाले की, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणी म्हणून राहणार नाही, तर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
-
या विमानतळाबाबत गेली २६ वर्षे राजकारण चालू होते. बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाच्या उद्घाटनामुळे केवळ राजकारणाचा खेळच संपला नाही, तर पूर्वांचलच्या सर्वांगीण विकासासाठी गती मिळवण्याचे साधन बनले आहे. कुशीनगरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी राज्याला तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची भेट दिली आहे.
-
कुशीनगरचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने १९४५-४६ मध्ये धावपट्टी बांधली. पण ९० च्या दशकात यावर राजकारण सुरू झाले. ५ सप्टेंबर १९९५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी धावपट्टीच्या जीर्णोद्धाराच्या कामाची पायाभरणी केली.
-
पुढच्याच महिन्यात, काँग्रेस सरकारमधील तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री गुलाम नबी आझाद यांनी १० ऑक्टोबर १९९५ रोजी टर्मिनलची पायाभरणी केली. टर्मिनल इमारत तीन वर्षांत पूर्ण झाली आणि दोन रडार बसवण्यात आले. (फोटो सौजन्य pib civil aviation)
-
२००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आश्वासन दिले आणि मार्च २०१० मध्ये भूसंपादनासाठी अध्यादेश जारी केला. पण योजना प्रत्यक्षात आली नाही. २०१३ मध्ये, सपा सरकारने विमानतळाच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या, पण राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कोणीही पुढे आले नाही. २०१४ मध्ये सपा सरकारने १६३ हेक्टर जमीन संपादित केली. मे २०१५ मध्ये ही जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली
-
२०१७ मध्ये बहुमत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामामध्ये उत्सुकता दाखवली. केंद्र आणि राज्य सरकारांच्या दरम्यान अनेक फेऱ्यांनंतर, ५ मार्च २०१९ रोजी उत्तर प्रदेश सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात ग्रीनफिल्ड विमानतळासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
-
१० ऑक्टोबर २०१९ रोजी राज्य सरकारने हे विमानतळ विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द केले. २४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित केले आणि २२ फेब्रुवारी २०२१ रोजी डीजीसीए लायसन्सही दिले. (फोटो ANI)
-
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्यातील सर्वात लांब धावपट्टी (३.२ किमी लांब आणि ४५ मीटर रुंद) विमानतळ आहे. एप्रनवर चार मोठी विमाने उभी राहू शकतात. त्याची धावपट्टी क्षमता आठ उड्डाणे (४ आगमन आणि ४ निर्गमन) प्रति तास आहे.
-
विमानतळावर दिवसाच नव्हे तर रात्री उड्डाण करणे शक्य व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची अंतरिम प्रवासी टर्मिनल इमारत ३६०० चौरस मीटरवर बांधली गेली आहे. त्याची पीक तास प्रवासी क्षमता ३०० प्रवासी प्रति तास आहे. हे विमानतळ २६० कोटी रुपये खर्चून ५८९ एकरवर बांधले गेले आहे. त्याच्या सक्रियतेसह, पर्यटन विकास, गुंतवणूक, रोजगार यासाठी एक मोठे व्यासपीठ तयार केले जात आहे. (फोटो ट्विटर)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!