-
चार दशकांपूर्वी मालदीवमध्ये बंडाची परिस्थिती उद्भवली होती तेव्हा भारताने तेथे सेनादले पाठवून बंड मोडून काढले होते आणि तत्कालीन सरकारची पुर्नस्थापना केली होती. (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook)
-
मालदीवमध्ये १९८८ साली मौमून अब्दुल गयूम हे अध्यक्ष होते. त्यांच्या राजवटीविरुद्ध १९८० आणि १९८३ साली बंडाचे प्रयत्न झाले होते. (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook)
-
१९८८ साली मालदीवचे प्रभावशाली व्यापारी अब्दुल्ला लुथुफी यांनी श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांच्या पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (प्लोट) नावाच्या संघटनेबरोबर हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष गयूम यांच्याविरुद्ध बंड केले होते. (फोटो सौजन्य – Reuters)
-
८० बंडखोरांनी मालवाहू जहाजावरून मालदीवची राजधानी मालेमध्ये लपून प्रवेश केला. तत्पूर्वी साधारण तेवढेच बंडखोर पर्यटकांच्या वेशात मालेमध्ये घुसले होते. या बंडखोरांनी राजधानी मालेमधील महत्त्वाच्या सरकारी इमारतींचा, रेडिओ स्टेशन आदींचा ताबा घेतला. अध्यक्ष गयूम यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र गयूम बंडखोरांपासून निसटले आणि त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली.
-
भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गयूम यांची मागणी मान्य करून ताबडतोब मदत पाठवली. भारतीय सेनादलांच्या मालदीवमधील कारवाईला ऑपरेशन कॅक्टस असे सांकेतिक नाव दिले होते. ३ नोव्हेंबर १९८८ रोजी रात्री ऑपरेशन कॅक्टसला सुरुवात झाली. (Express Archive)
-
ऑपरेशन कॅक्टस दरम्यान, भारताच्या पॅरा ब्रिगेडने ३ नोव्हेंबर १९८८ रोजी, अतिरेकी हल्ला सुरू झाल्यानंतर काही तासांनी मालदीवमधील हुल्हुले विमानतळावर दारूगोळा उतरवला. (फोटो क्रेडिट: मालदीव विमानतळ आणि फायर रेस्क्यू/ट्विटर)
-
गयूम यांच्याकडून मदतीची मागणी झाल्यानंतर काही तासांत भारतीय सेनादले साधारण २००० किलोमीटरचे अंतर पार करून मालदीवच्या भूमीवर उतरली होती. आग्रा येथील तळावरून भारतीय हवाई दलाच्या इल्युशिन आयएल-७६ मालवाहू विमानांमधून ५०वी स्वतंत्र पॅराशूट ब्रिगेड, पॅराशूट रेजिमेंटची ६वी बटालियन, १७वी पॅराशूट फिल्ड रेजिमेंट यांच्या तुकडय़ा एकत्र करण्यात आल्या होत्या. (Photo credit: Maldives National Library)
-
पॅरा कमांडोंनी माले विमानतळ आणि अन्य इमारती बंडखोरांच्या ताब्यातून सोडवल्या आणि अध्यक्ष गयूम यांना वाचवले. (Photo credit: Historical photos of Maldives/Facebook)
-
काही बंडखोर आणि त्यांचा नेता अब्दुल्ला लुथुफी नौकेतून पळून जाऊ लागला. भारतीय नौदलाच्या आयएनएस गोमती आणि बेतवा या युद्धनौकांनी आणि त्यांच्यावरील हेलिकॉप्टरनी या नौकेचा पाठलाग करून श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ त्यांना जेरबंद केले. (फोटो क्रेडिट: मालदीव नॅशनल लायब्ररी)
-
भारतीय हवाई दलाच्या कॅनबेरा आणि मिराज लढाऊ विमानांनी मालदीववरून कमी उंचीवरून उड्डाणे करून बंडखोरांवर जरब बसवली होती. (प्रातिनधीक छायाचित्र
-
भारतीय लष्कर आणि हवाई दल आधीच मालदीवमध्ये पोहोचले असताना, आयएनएस बेतवा कोचीनहून निघाली आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीपूर्ण भेटीवरून परतणारी आयएनएस गोदावरी तिला मिळाली. (फोटो क्रेडिट: विकिमीडिया कॉमन्स.)
-
ऑपरेशन कॅक्टस दरम्यान, आयएनएस गोदावरीवरुन हिंद महासागरातील प्रोग्रेस लाइटवर गोळीबार केला होता (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook)
-
त्यानंतर भारतीय सैनिक ४ नोव्हेंबर १९८८ रोजी पहाटे मालेच्या रस्त्यावर शोध आणि गस्त मोहीम राबवत होते. (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook) -
संघर्ष संपल्यानंतर नोव्हेंबर १९८८ मध्ये माले येथील NSS मुख्यालयाबाहेर भारतीय सैनिक जमा झाले होते. ते इमारतीत सामान नेण्यात मदत करताना दिसतात. (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook)
-
राष्ट्रपती गयूम यांना भारतीय आणि एनएसएस सैनिकांनी कडक सुरक्षा पुरवली होती. (फोटो क्रेडिट: मालदीव नॅशनल लायब्ररी)
-
कर्नल सुभाष सी जोशी, मालदीवमधील भारताचे उच्चायुक्त अरुण बॅनर्जी आणि ब्रिगेडियर फारुख बुलसारा एका अज्ञात व्यक्तीसह (पांढऱ्या शर्टमध्ये), मालदीवमधील माले, नोव्हेंबर १९८८ मध्ये दहशतवाद्यांच्या अटकेनंतर NSS मुख्यालयाबाहेर उभे होते. (फोटो क्रेडिट: आर्काइव्ह्ज ऑफ द ६ PARA, इंडियन आर्मी)
-
काही भारतीय सैनिक मालदीवच्या सरकारच्या विनंतीवरून ३ नोव्हेंबर १९८८ च्या सत्तापालटाच्या प्रयत्नाच्या तपासात मदत करण्यासाठी मालदीवमध्ये परतले होते. (फोटो क्रेडिट: Historical photos of Maldives/Facebook)
-
ऑपरेशन कॅक्टसच्या काही महिन्यांनंतर पंतप्रधान राजीव गांधींसोबत अध्यक्ष गयूम. (फोटो क्रेडिट: मालदीव नॅशनल लायब्ररी)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!