-
नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता फक्त महिन्याचा कालावधी राहिला आहे. करोनामुळे संकाटांचा सामना करावा लागलेल्या प्रत्येकाला पुढील वर्ष तरी सुखाचं आणि समाधान देणारं असावं अशी अपेक्षा आहे. दरम्यान ज्योतिष शास्त्रानुसार सहा राशींसाठी पुढील वर्ष चांगलंच लाभदायक आहे. पुढील वर्ष या सहा राशींसाठी फक्त चांगलं नाही तर नशीब बदलणारंही ठरु शकतं. जाणून घेऊयात या राशींबद्दल…
-
सिंह (Leo): सिंह राशीच्या लोकांसाठी २०२२ हे वर्ष शुभ आणि भाग्यशाली असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनेक संधी मिळण्याचा योग आहे. नवीन वर्षात लोकांची मदत करण्यापासून माघार घेऊ नका, कारण यामुळेच शुभ गोष्टी घडणार आहेत.
-
वृश्चिक (Scorpio): सिंह राशीप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांनाही २०२२ मध्ये अनेक नवीन संधी मिळणार आहेत. विशेष म्हणजे या संधींचं तुम्ही सोनंदेखील कराल. तुमची स्वप्नं नवीन वर्षात पूर्ण होऊ शकतात. यावेळी अनेक गोष्टी तुमच्या बाजूने असणार आहेत, त्यामुळे मिळालेल्या सर्व संधींचा फायदा करुन घ्या.
-
वृषभ (Taurus): या राशीच्या लोकांसाठी २०२२ वर्ष बदलांच्या दृष्टीने खूपच लाभदायक असणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आपल्या संपत्तीत वाढ होण्यासाठी प्रयत्न असेल. कामावर तुमच्या कामाचं प्रत्येकजण कौतुक करतील. एकूण पाहता २०२२ मध्ये तुमच्या सुखात वाढ होईल.
-
मकर (Capricorn): गेल्यावर्षीप्रमाणे २०२२ वर्षदेखील तुमच्यासाठी शुभ असणार आहे. यशाच्या मार्गावरील तुमची वाटचाल सुरु राहील.
-
मकर राशीच्या लोकांसाठी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर, आगामी काळात तुमचं भविष्य उज्ज्वल असेल आणि भाग्याचीही तुम्हाला साथ मिळेल.
-
कुंभ (Aquarius): या राशीचे लोक नशिबाची गोष्ट येते तेव्हा धनलाभ होईल अशी अपेक्षा करतात, पण प्रत्येकवेळी धनलाभच होईल असं नाही. जर प्रेमामुळे तुमच्या आयुष्यात खूप चढ उतार आले असतील तर नवीन वर्ष तुम्हाला आयुष्य पुन्हा एकदा योग्य क्रमाने सुरु करण्यास मदत करेल.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२२ वर्ष खूप चांगलं असेल अशी आशा आहे. मेहनत घेतल्यास तुम्हाला यश क्रमप्राप्त आहे.
-
तूळ (Libra): या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूपच शुभ असेल. तुम्हाला आयुष्यात मोठं यश मिळण्याची आशा आहे. प्रेमातही तुम्हाला चांगली साथ मिळेल, तसंच आर्थिक समस्याही दू होतील. नवीन संधी तुमच्यासाठी चालून येतील, पण त्यांचं सोनं करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल.

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!