-
गीता गोपीनाथ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.
-
जानेवारी २०२२ मध्ये गीता गोपीनाथ या जेफ्री ओकामोटोची जागा घेणार आहेत आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे त्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक बनतील. (Reuters)
-
आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्यानंतर गीता गोपीनाथ यांचा क्रमांक लागतो. (Express Photo By Pradip Das)
-
२०१८ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर IMF च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ बनलेल्या गीता या दुसऱ्या भारतीय आहेत. -
याआधी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्ट्रा इंटरनॅशनल स्टडीज आणि इकॉनॉमीच्या प्राध्यापक म्हणून काम केले आहे. (File/Reuters)
-
IMF च्या माजी व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लगार्ड यांनी गीता यांना जगातील सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ म्हटले आहे.
-
डिसेंबर १९७१ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जन्मलेल्या गीता गोपीनाथ कर्नाटकातील म्हैसूरमध्ये वाढल्या
-
डिसेंबर १९७१ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जन्मलेल्या गीता गोपीनाथ कर्नाटकातील म्हैसूरमध्ये वाढल्या. (Reuters)
-
त्यांचे वडील टीव्ही गोपीनाथ यांच्या म्हणण्यानुसार, गीता यांना खेळात रस होता. त्या गिटार शिकल्या आणि फॅशन शोमध्येही भाग घेतला, पण त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सर्व सोडून दिले.(AP)
-
सातवीपर्यंत ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या मुलीला ९० टक्के गुण मिळू लागले. मी माझ्या मुलांना कधीही अभ्यास करण्यास सांगितले नाही आणि त्यांच्यावर कोणतेही बंधने घातली नाहीत. त्यांचे मित्र घरी आले, अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी थांबले. (गीता गोपीनाथ/ इन्स्टाग्राम)
-
माझ्या दोन्ही मुली संध्याकाळी ७.३० पर्यंत झोपायच्या आणि लवकर उठायच्या, असे टीव्ही गोपीनाथ यांनी २०१८ मध्ये द वीकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.(गीता गोपीनाथ /ट्विटर)
-
गीताच्या वडिलांची इच्छा होती की तिने इंजिनीअरिंग करावे किंवा वैद्यकीय क्षेत्रात जावे, पण गीताने अर्थशास्त्राचा मार्ग निवडला. (Twitter/ PTI Photo)
-
२००१ मध्ये गीता यांना भारतात परतायचे होते पण त्यांच्या शिक्षकांनी त्यांना थांबवले. तेव्हापासून गीता अमेरिकेत आहे. त्यांच्या कुटुंबामुळे त्या भारतात येतात. (AP/PTI Photo)
-
गीता यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हींमधून एमएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर २००१ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली. (PTI Photo)
-
त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला कार्यक्रमात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पीएचडी पूर्ण केल्यानंतर, गीता शिकागो विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये सहाय्यक प्राध्यापक बनल्या. (Photograph by AP/PTI)
झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”