-
मुंबईत लवकरच महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षा रस्त्यावर धावणार आहेत.
-
महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली आहे. या रिक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे.
-
महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली. त्यांचे अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
-
ट्रिओ रिक्षाचे अनावरण झाल्यानंतर स्वत: उद्योगमंत्र्यांनी रिक्षा चालवली आणि वाहनाविषयी माहिती जाणून घेतली.
-
इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाच्या उद्घाटनप्रसंगी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.
-
वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात २०३० पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील.

Khokya Bhosale Arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात