-
अनुपमा या टीव्ही मालिकेमध्ये काम करणाऱ्या केतकी दवेचा अभिनेता पती रसिक दवे यांचे नुकतेच निधन झाले. रसिक 65 वर्षांचे होते. केतकी दवे सोबतच इतरही अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपला पतीला कमी वयातच गमावले आहे.
-
मयुरी देशमुख हिने २०१६ मध्ये आशुतोष भाकरेशी लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर आशुतोषने २०२० मध्ये आत्महत्या केली होती.
-
अभिनेत्री मंदिरा बेदी हिला वयाच्या ४९ व्या वर्षी पतीच्या निधनाचा धक्का बसला होता. तिचे पती राज कौशल यांनी २०२१ मध्ये या जगाचा निरोप घेतला.
-
बुनियाद या टीव्ही मालिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री कृतिका देसाई हिचा पती इम्तियाज खान यांचे २०२० मध्ये निधन झाले.
-
अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री शांतीप्रिया हिने अभिनेता सिद्धार्थसोबत लग्न केले होते. मात्र, ती ३५ वर्षाची असतानाच तिने आपला पती गमावला.
-
अभिनेत्री काहकाशन पटेल हिच्या पतीचा मृत्यू देखील २०१८ मध्ये झाला. तेव्हापासून ती एकटीच आयुष्य जगते आहे.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती