-
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
-
बडा कब्रिस्तानमध्ये असलेल्या या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले. त्यावरून भाजपने महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
-
“या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याच्या जनतेची माफी मागावी. कबरीच्या सुशोभीकरणासाठी जबाबदार लोकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी,” अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली सरकारकडे केली आहे.
-
“या देशात दहशतवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने जे लोक काम करतात ते या देशाचे शत्रू आहेत. ते एका जातीचे, धर्माचे, समुहाचे, वयाचे शत्रू नाहीत, तर या देशाचे, भारतमातेचे शत्रू आहेत,” अशा शब्दांमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
-
तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेला यांनी याप्रकरणावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते,” असा खोचक टोला शिवसेनेला लगावला आहे.
-
“दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून, याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!,” असं ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
-
“उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींनी मुंबईकरांची जाहीर माफी मागितली पाहिजे. ही कबर एखाद्या पीरबाबाची नव्हे तर 1993 मधील मुंबई स्फोटांतील दोषी याकूब मेमनची आहे,” असे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
-
“पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं दफन का झालं? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचं समुद्रात दफन झालं. मग याचं एवढं मोठं दफन यांनी का केलं? शिवाय दफन करताना एनओसी घेणं गरजेचं आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे, महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही,” असं स्पष्टीकरण याप्रकरणावर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
-
“आशिष शेलारांकडे २०१७ मध्ये आणि आता पण मुंबईची जबाबदारी आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कितीही टीका केली, तरी त्यांची लोकप्रियता काही कमी होत नाही. ‘जामा मशीद ऑफ बॉम्बे ट्रस्ट’ यांची ही कब्रस्थान आहे. त्यामुळे हे सर्व या ट्रस्टमार्फत झाले आहे. यामध्ये काडीचाही संबंध मुंबई महापालिकेचा नाही,” असे प्रत्युत्तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.

Khokya Bhosale Arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात