-
मध्य प्रदेशातील इंदूरमधील जुन्या टाईपरायटर्सचे संग्रहालय सध्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.
-
या संग्रहालयात अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स, इटली, जापान आणि चीनमधील जुने टाईपरायटर्स ठेवण्यात आले आहेत. १८९० साली निर्मित सर्वात जुना टाईपरायटर या संग्रहालयात आहे.
-
या संग्रहालयात जगभरातील विविध प्रकारचे ४५० टाईपरायटर्स आहेत. राजेश शर्मा यांच्या मालकीचे इंदूरमध्ये हे संग्रहालय आहे.
-
१९१० ते १९३० या कालावधीत निर्मित टाईपरायटर्स या संग्रहालयात आहेत. ‘मर्सिडीज’, ‘रॉयल’, ‘कोरोना’, ‘ट्रॅम्प’ या कंपनीचे टाईपरायटर्स या संग्रहालयात उपलब्ध आहेत.
-
स्मार्टफोन्सच्या जगात या टाईपरायटर्सची ओळख टिकून राहावी, यासाठी हे संग्रहालय चालवत असल्याचे राजेश शर्मा यांनी म्हटले आहे.
-
राजेश शर्मा यांचे वडील माधव प्रसाद शर्मा जिल्हा न्यायालयाबाहेर टायपिंगचे काम करायचे. त्यांच्या कामातूनच टाईपरायटर्सचा संग्रह करण्याची प्रेरणा राजेश यांना मिळाली.
-
राजेश यांच्या संग्रही ‘रेमिंग्ट्न’ कंपनीचा टाईपरायटरदेखील आहे. या कंपनीने सर्वात आधी टाईपरायटची निर्मिती केली होती.
-
जुन्या काळात कोरोना कंपनीने बनवलेला टाईपरायटर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध असल्याचे राजेश सांगतात. २.५ किलो वजनाचा हा टाईपरायटर लहान आणि वापरण्यास सोयीस्कर आहे.
-
(फोटो सौजन्य- एएनआय)
