-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे दिल्लीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १७ सप्टेंबर म्हणजेच मोदींच्या वाढदिवसापासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आणि हितचिंतकांनी अनमोल स्मृतीचिन्हांनी सन्मानित केले आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या प्रदर्शनात चित्रं, शिल्पं, हस्तकला आणि लोक कलाकृतींच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
नवी दिल्लीतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाला दिल्लीकरांनी गर्दी केली आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या प्रदर्शनात १२०० मौलवान वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरांच्या प्रतिकृतींचादेखील समावेश आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
कुस्ती, हॉकी, लॉन बॉलिंग आणि पॅरा पावरलिफ्टिंग या क्रिडा प्रकारातील खेळाडूंचे ऑटोग्राफ असलेल्या टी-शर्ट क्रिडाप्रेमींना खरेदी करता येणार आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
भेटवस्तूंचा ई-लिलाव २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू असणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंची ही चौथी आवृत्ती आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचा pmmementos.gov.in. या संकेतस्थळावर ई-लिलाव करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या प्रदर्शनात खेळाशी निगडित वस्तू, कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृती क्रिडा प्रेमींसाठी आकर्षण ठरत आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
या प्रदर्शनात १२०० मौलवान वस्तू ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
लिलावाद्वारे जमा होणारा निधी ‘नमामी गंगे’ योजनेसाठी दिला जाणार आहे.(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
-
(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती