-
‘महालया’ विधीसाठी उत्तर कोलकात्यातील गंगा घाटावर आज भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कृष्णपक्षाच्या शेवटच्या दिवशी घाटावर भाविकांनी तर्पन पूजा केली. (फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
-
कोलकात्यातील हुबळी नदी किनाऱ्यालगत असलेल्या बाबू घाटावर भाविकांनी तर्पन पूजा केली. (फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)
-
या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, अशी मान्यता आहे.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
-
हा दिवस विजय आणि धैर्याचे प्रतिक आहे. या दिवशी पश्चिम बंगालमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रादेशिक वाहिन्यांवर या परंपरेशी संबंधित नृत्य प्रसारित केले जातात.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
-
महालयापासून देवीपक्षाची सुरुवात होते. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. पितृपक्षात हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते.(फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)
-
बंगाली समाजामध्ये दूर्गा पूजा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महालयाच्या दिवशी दूर्गा देवी महिषासुराचा वध केल्यानंतर पृथ्वीवर अवतरली होती, अशी बंगाली समाजामध्ये मान्यता आहे.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
-
पितृपक्ष अशुभ मानला जातो. या काळात श्राद्ध किंवा अंत्यविधी केले जातात. या दरम्यान लोक नैवेद्य दाखवून पितरांचे स्मरण करतात.(फोटो सौजन्य-पार्था पॉल, एक्स्प्रेस)
-
या दिवशी दूर्गा देवी कैलाश पर्वतातून तिच्या माहेरी म्हणजेच पृथ्वीकडे प्रस्थान करते, अशी समाजमान्यता आहे. (फोटो सौजन्य-शशी घोष, एक्स्प्रेस)
-
(फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात