-
नीलकुरिंजी हे फुल १२ वर्षांमधून एकदा फुलतं. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकातील पश्चिम घाटामध्ये ही फुलं सध्या बहरली आहेत.
-
नीलकुरिंजी हे एक दुर्मीळ फुल आहे. ऑगस्टपासून ते ऑक्टोबरपर्यंत या फुलांचा बहरण्याचा हंगाम असतो.
-
नीलगिरी पर्वतांचे नाव याच फुलांवरुन ठेवण्यात आले आहे. ही फुलं जमिनीपासून १३०० ते २४०० मीटर उंचीवर उगवतात.
-
बदलत्या हवामानामुळे या फुलांच्या हंगामामध्ये गेल्या काही वर्षांपासून बदल होत आहे. भारतामध्ये नीलकुरिंजीचे ४६ प्रकार आहेत.
-
या फुलांना बघण्यासाठी दक्षिण भारतात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. हे फुल समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
-
‘स्ट्रोबिलेंथेस कुंथियाना’ या नावानेही नीलकुरिंजी फुलं प्रसिद्ध आहेत.
-
या वर्षीचा हंगाम संपल्यानंतर ही फुलं बघण्यासाठी २०३४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
-
३ हजार हेक्टरवर ही फुलं बहरली आहेत. ही फुलं ३० ते ६० इंचांची असतात. या फुलांमधून निघणारे मध १५ वर्षांपर्यंत खराब होत नाही.
-
(फोटो सौजन्य- जीथेंद्र एम.)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात