-
रामलीला कार्यक्रमाला दिल्लीतील कोपरनिकस मार्गावरील केंद्रा लॉन्समध्ये २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे.
-
श्रीराम भारतीय कला केंद्राकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या केंद्राने आत्तापर्यंत ६६ वेळा रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे.
-
‘श्रीराम’ या नाटकात पारंपारिक नृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘छऊ’ आणि ‘कलारीपयात्तू’ या नृत्य प्रकारांचे सादरीकरण कलाकारांकडून केले जात आहे.
-
नवरात्री आणि दूर्गापुजेच्या पार्श्वभूमीवर कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे. करोना साथीमुळे गेली दोन वर्ष या कलेचे सादरीकरण होऊ शकलं नाही.
-
करोना साथीनंतर अनेक दिग्गजांनी रंगमंचाचा निरोप घेत नव्या प्रतिभेला कला सादर करण्यास वाव दिला, असे कला केंद्राच्या संचालक शोभा सिंग यांनी सांगितले आहे.
-
अत्यंत कमी वेळात उत्तम कलेचे सादरीकरण या रंगकर्मींकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
-
यावर्षी श्रीराम भारतीय कला केंद्राच्या ४० रंगकर्मींकडून कलेचे सादरीकरण केले जात आहे. कलाकारांचे पोषाख, दागिने आणि शस्त्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे सर्व कलाकारांनी स्वत: तयार केले आहे.
-
दिल्लीतल कोपरनिकस मार्गावरील केंद्रा लॉन्समध्ये संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊपर्यंत या कार्यक्रमाचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे.
-
(फोटो सौजन्य- प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…