-
संयुक्त अरब अमिरातीत नुकतेच हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
हे मंदिर हिंदू आणि अरबी शैलीनुसार जेबेल अली या गावात बांधण्यात आले आहे. हे गाव लगतच्या परिसरात प्रार्थनेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
संयुक्त अरब अमिरातीतील हे मंदिर सहनशीलता, शांती आणि सलोख्याचे प्रतिक आहे. अरबी पाहुण्यांचे टिळा लावून उद्घाटन कार्यक्रमात स्वागत करण्यात आले.(फोटो सौजन्य- एपी)
-
उद्घाटन कार्यक्रमात पुजाऱ्यांकडून ‘ओम शांती ओम’चा नामजप करण्यात आला. (फोटो सौजन्य- एपी)
-
मंदिरातील मुख्य सभागृहात उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संयुक्त अरब अमिरातीतील राज्य मंत्री शेख बीन मुबारक अल-नेहयान यांच्यासह भारताचे राजदूत सुधीर, दुबईतील हिंदू मंदिराचे विश्वस्त राजू श्रॉफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(फोटो सौजन्य- एपी)
-
७० हजार चौरस फुटांच्या या मंदिराच्या बांधकामाची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. या मंदिरातील राधा-कृष्ण, राम-सीता यांच्या सुबक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.(फोटो सौजन्य- रॉयटर्स)
-
जेबेल अली या गावात नऊ समाजांची धार्मिक स्थळं आहेत. यामध्ये सात चर्च, एक गुरुद्वारा आणि नव्याने बांधलेल्या हिंदू मंदिराचा समावेश आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
दुबईमध्ये १९५८ साली पहिल्यांदा मंदिर बांधण्यात आले होते. त्यानंतर यूएई सरकारकडून हिंदू भाविकांसाठी देशभर अनेक मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य- एपी)
-
या मंदिरात १६ देवी-देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य- रॉयटर्स)
-
भारतीय वाद्य तबला आणि ढोलच्या साथीने मंदिरात प्रवेश करण्याऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य- रॉयटर्स)
-
या मंदिरातील भींतीवर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. हिंदू आणि अरबी संस्कृतीच्या मिश्रणातून बनलेल्या या कलाकृतीकडे भाविकांची पाऊलं वळत आहेत.(फोटो सौजन्य- रॉयटर्स)
-
मंदिर समितीकडून वर्षाच्या अखेरीस एक भव्य समाज केंद्र बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी हिंदू समाजातील विवाहासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य- रॉयटर्स)

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…