-
घराघरात दिवाळीसाठी लगबग सुरू झाली आहे. दिव्यांच्या या सणासाठी बाजारदेखील सजले आहेत.
-
मुंबईच्या माहिममध्ये कागदांनी बनलेल्या आकाशकंदीलांची विक्री करण्यात येत आहे. विविध रगांच्या आकर्षक कंदीलांनी ग्राहकांची पावले या दुकानांकडे वळत आहेत.
-
कंदीलांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
-
प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
-
या सणासाठी आकाशकंदील, पणत्या, रोषणाईच्या माळ्या, दाराच्या रंगीबेरंगी तोरणांनी बाजार फुलला आहे.
-
कागदाने बनवलेल्या आकाशकंदीलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. चायनीज आकाशकंदीलाचीही ग्राहकांना भुरळ पडली आहे.
-
चिनी मातीच्या पणत्यांनीही बाजार सजला आहे. यावरील आकर्षक नक्षीकाम आणि रंगांची सजावट ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
महागाईचा फटका दिवाळीलाही बसला आहे. आकाशकंदील, पणत्यांसह इतर साहित्यांच्या दरांमध्ये यंदा १० टक्क्यांची वाढ झालेली आहे.
-
दिवाळीच्या आगमनाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा ग्राहकांकडून समाधानकारक खरेदी झाल्यास दोन वर्षांचे नुकसान भरून निघण्याची दुकानदारांना आशा आहे.
-
दोन वर्ष करोना प्रादुर्भावामुळे दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यंदा दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.
-
दिवाळीत कपडे, सोने, घरगुती इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह अन्य खरेदीकडे नागरिकांचा चांगला कल आहे.
-
(फोटो सौजन्य- गणेश शिरसेकर, एक्स्प्रेस)

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण