-
नायजेरियातील इगबो-ओरा या शहरात गेल्या १२ वर्षांपासून ‘ट्विन्स फेस्टिवल’ साजरा केला जात आहे. (फोटो सौजन्य-एपी)
-
शहरातील जुळ्या मुलांचे महत्त्व साजरे करण्यासाठी दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो. केहिन्दे अदमोलेकून आणि तायवो अदमोलेकून या जुळ्या बहिणींनी या उत्सवात सहभाग नोंदवला.(फोटो सौजन्य-एपी)
-
शहरातील जवळपास प्रत्येक कुटुंबात जुळी मुलं आहेत. इग्बो-ओरा व्याकरण माध्यमिक विद्यालयाच्या जुळ्या विद्यार्थीनी तैवो अससी (डावीकडे) आणि केहिंदे असिसी (उजवीकडे) यांनी या उत्सवात हजेरी लावली.(फोटो सौजन्य-एपी)
-
यावर्षी उत्सवात १ हजारहून अधिक जुळ्यांनी सहभाग नोंदवला आहे.(फोटो सौजन्य-एपी)
-
इगबो-ओरा शहरातील महिलांच्या आहारामुळे जुळ्यांच्या जन्माचं प्रमाण या ठिकाणी जास्त असल्याचं बोललं जातं.(फोटो सौजन्य-एपी)
-
दक्षिण-पश्चिम नायजेरियातील इग्बो-ओरा येथे होणाऱ्या वार्षिक जुळ्या भावंडांच्या महोत्सवात तैवो ओजेनिया (डावीकडे) आणि २७ वर्षीय केहिंदे ओजेनियी या जुळ्या मुलांनी सहभाग नोंदवला.(फोटो सौजन्य-एपी)
-
५२ वर्षीय काहिंदे ओयेदिरन (डावीकडे) आणि तैवो ओयेदिरान(फोटो सौजन्य-एपी)
-
नायजेरीयातील या शहरात जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक का आहे? याबाबत अद्याप शास्त्रीय कारण पुढे आलेलं नाही.(फोटो सौजन्य-एपी)
-
जुळी मुलं देवाचा आर्शीर्वाद असल्याची या शहरात मान्यता आहे.(फोटो सौजन्य-एपी)

Snehal Jagtap : ठाकरे गटाला मोठा धक्का, धडाडती तोफ अजित पवारांच्या पक्षात; म्हणाल्या, “पक्षनेतृत्त्वावर नाराज नाही, पण…”