-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
-
शेतकरी बंधू-भगिनींना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला.
-
तुम्ही धीर सोडू नका, राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुप्पट मदत केली, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-
शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाचा सामना करावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
-
“माझ्याकडे पण शेती आहे. माझे वडील, आजोबा सर्व शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातला साधा माणुस मुख्यमंत्री होतो, हेदेखील या राज्याने आणि देशानं पाहिलं आहे”, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
-
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका केली जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
-
“नियम बाजूला ठेवून काम करणारं हे सरकार आहे. बळीराजाला संकटात ठेवून हे सरकार पुढं जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना न्याय देत सरकार पुढे जाणार आहे” असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
-
मुंबईतील या कार्यक्रमात राज्यभरातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.
-
‘वर्षा’वरील या कार्यक्रमात संपूर्ण शिंदे कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.
-
सगळ्यात महत्त्वाचा घटक बळीराजा आहे. नैसर्गिक आपत्तीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
-
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. (‘सर्व फोटो- एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम’)

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल